आशिया चषकातील (Asia Cup 2022) अंतिम सामने राहिले आहेत. श्रीलंका (Shrilanka) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी आत्तापासून आपली रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. आशिया चषक सुरु झाल्यापासून आपण खेळाडूंमधला संघर्ष पाहतोय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील कालच्या सामन्यात संघर्ष पाहायला मिळाला. तोच संघर्ष शेवटच्या सामन्यात देखील पाहायला मिळणार आहे.
Naseem Shah, remember the name?#PAKvAFG #AsiaCup2022pic.twitter.com/aJ7KqMcCUZ
हे सुद्धा वाचा— Farid Khan ???? (@_FaridKhan) September 7, 2022
कालचा सामन्यात खरा हिरो ठरला नसीम शाह, त्याच्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या चाहत्यांनी त्याला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सामना संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी शाहला एक प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने मजेशीर उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
रवी शास्त्री यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर शाह म्हणाला की, माझी बॉलिंग सद्धा ठीक होत आहे. परंतु मी बॉलर असल्याचा मला आता विसर पडला आहे. हे उत्तर देताना शाह अधिक हसत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
सामना रोमांचक स्थितीत असताना नसीम शाह याने शेवटच्या षटकात सुरुवातीच्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार खेचले. त्यामुळे पाकिस्तान संघाचा विजय झाला.