Asia Cup 2022: कोण जिंकेल आशिया कप ? विरेंद्र सेहवागच्या उत्तराने क्रिकेट चाहत्यांचा गोंधळ

| Updated on: Sep 06, 2022 | 12:31 PM

आजच्या सामन्यात श्रीलंके विरुद्ध भारताला विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच पाकिस्तानचा संघ यंदाचा आशिया चषक जिंकू शकतो अशी भविष्यवाणी सेहवागने केली आहे.

Asia Cup 2022: कोण जिंकेल आशिया कप ? विरेंद्र सेहवागच्या उत्तराने क्रिकेट चाहत्यांचा गोंधळ
Virendra sehwag
Image Credit source: twitter
Follow us on

आशिया चषक (Asia Cup 2022) सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) क्रिकेटची अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंची देखील अधिक चर्चा होत आहे. पाकिस्तानकडून रविवारी झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघावरती सोशल मीडियावर जोरादार टीका झाली. आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत दुबईत होणार आहे. आजचा सामना भारतीय संघाला जिंकावा लागणार आहे. भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यानंतर विरेंद्र सेहवागच्या (Virendera Sehwag) विधानामुळे अनेक चाहत्यांचा गोंधळ झाला आहे.

सेहवागची भविष्यवाणी खरी ठरेल का ?

भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तसेच त्याने केलेली ट्विट अनेकदा त्याच्या चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडतात असं अनेकदा दिसून आलंय. भारत पाकिस्तान यांच्यात मॅच झाल्यानंतर सेहवागने एक भविष्यवाणी व्यक्त केली आहे.

आजचा विजय महत्त्वाचा

आजच्या सामन्यात श्रीलंके विरुद्ध भारताला विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच पाकिस्तानचा संघ यंदाचा आशिया चषक जिंकू शकतो अशी भविष्यवाणी सेहवागने केली आहे. भारतीय संघ आज जर हारला तर त्यांना आशिया चषकातून बाहेर पडावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय संघासाठी आज करो या मरो अशी स्थिती

पाकिस्तानचा संघ जरी हारला तरी त्यांना फरक पडत नाही, त्यांचा रनरेट अधिक असल्याने ते अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे भारतीय संघासाठी आज करो या मरो अशी स्थिती आहे.