Asia Cup 2023 : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची अशी गेली अब्रू, लाईव्ह सामन्यात झालं असं की..

| Updated on: Sep 06, 2023 | 8:27 PM

Pakistan vs Bangladesh, Asia Cup 2023 : पाकिस्तान बांगलादेश यांच्यात सुपर 4 फेरीतील सामना सुरु आहे. मात्र हा सामना काही कारणास्तव थांबवण्यात आला. मात्र कारण काही वेगळंच होतं त्यामुळे सोशल मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

Asia Cup 2023 : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची अशी गेली अब्रू, लाईव्ह सामन्यात झालं असं की..
Asia Cup 2023 : आशिया कपचं पाकिस्तानकडून ढीसाळ नियोजन, बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात आता असं झाल
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुपर फेरीतील सामना सुरु आहे. बांगलादेश संघानं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं बांगलादेशचा हा निर्णय फोल ठरवला. पाकिस्तानने 38.4 षटकातच बांगलादेशचा डाव गुंडाळला. बांगलादेशनं 193 धावा केल्या असून विजयासाठी 194 धावांचं आव्हान दिलं आहे. पण पाकिस्तानचा खेळ सुरु असताना पाचव्या षटकात हा सामना थांबवावा लागला. यामुळे पाकिस्तानकडून मैदानात उतरलेले सलामीचे फलंदाज आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ मैदानाबाहेर पडले. सामना थांबवला तेव्हा फकर झमानने 20 चेंडूत 13 आणि इमाम उल हकने 10 चेंडूत 2 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानच्या 5 षटकात 15 धावा झाल्या होत्या. तांत्रिक कारणामुळे हा सामना थांबवावा लागला.

काय झालं मैदानात?

स्टेडियममधील फ्लड लाईट खराब झाल्याने हा सामना थांबवावा लागला. भारतीय वेळेनुसार, 6 वाजून 56 मिनिटांनी सामना थांबवला आमि 7 वाजून 13 मिनिटांनी सामना सुरु झाला. जवळपास 20 मिनिटं हा सामना थांबवण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानला आशिया कप आयोजनावरून खडे बोल सुनावले जात आहेत. दुसरीकडे, अथक प्रयत्नांनी फ्लड लाईट दुरुस्त करण्यात आली आणि सामना पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानने केलेल्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

बांगलादेशचा डाव

बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहिम यांनी चांगली खेळी केली. शाकिबने 57 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. तर मुशफिकर रहिमने 87 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. पाकिस्तानकडून हारिस रौफ याने 4, नसीम शाह याने 3 आणि शाहीन अफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमद याने प्रत्येकी एक गडी बाद केला

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.