धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम

| Updated on: Jul 21, 2019 | 12:53 PM

भारताची धावपटू हिमा दासनं शनिवारी (20 जुलै) आणखी एक सुवर्णपदकं पटकावलं. तिनं चेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत पहिलं स्थान मिळवलं.

धावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम
Follow us on

वी दिल्ली: भारताची धावपटू हिमा दासनं (Athlet Hima Das) शनिवारी (20 जुलै) आणखी एक सुवर्णपदकं (Gold Medal) पटकावलं. तिनं चेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत पहिलं स्थान मिळवलं. हिमानं 52.09 सेकंदांमध्ये हे अंतर पूर्ण केलं. तिनं ट्विट करत याची माहिती दिली.

हिमानं एकाच महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 5 सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम केलाय. हिमानं 3 जुलै रोजी युरोपमध्ये, 7 जुलै रोजी कुंटो अॅथलेटिक्स मीटमध्ये, 13 जुलै रोजी चेक प्रजासत्ताकमध्ये आणि 17 जुलैला टाबोर ग्रांप्रीमध्ये अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हिमाच्या या सुवर्ण घोडदौडीचे जगभरातून कौतुक होत आहे. सिनेकलाकारांपासून अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही हिमाचं विशेष कौतुक केलं आहे. तसंच तिचा देशाला अभिमान असल्याचं सांगितलं.

चेक प्रजासत्ताकमधील या स्पर्धेत इतर भारतीय धावपटूंनीही चमक दाखवली. यात दुसऱ्या स्थानावरही भारतीय धावपटू व्ही. के. विस्मया होती. विस्मयानं 52.48 सेकंदांमध्ये ही धाव पूर्ण केली. तिला हे 400 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी हिमापेक्षा 5.3 सेकंद अधिक लागले. तिसऱ्या क्रमांकावर सरिता बेन गायकवाड ही धावपटू होती. तिनं 53.28 सेकंदांमध्ये अंतर पूर्ण केलं.

पुरुषांच्या 200 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने 20.95 सेकंदमध्ये अंतर पूर्ण करत दुसरा क्रमांक मिळवला. दुसरीकडं पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टोमने 46.05 सेकंदात शर्यत पूर्ण करुन रौप्य पदक जिंकलं. पुरुषांची 400 मीटरची शर्यत भारताच्या एम. पी. जाबिरनं 49.66 सेकंदात पूर्ण करुन सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. जितिन पॉल 51.45 सेकंदासह दुसऱ्या स्थानावर होता.