औरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Mohammad Azharuddin). औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात अझरुद्दीन यांच्यासह तिघांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दानिश टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या मालकाने अझरुद्दीन यांच्याविरोधात 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती (Case Filed Against Mohammad Azharuddin).
ट्रॅव्हल एजेन्सीचा मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद अझरुद्दीन यांनी विदेश यात्रेसाठी टिकीट बुक केले होते. मात्र, अद्याप त्याचे पैसे दिलेले नाहीत. अझरुद्दीन हे नेहमी पैसे देण्याचे आश्वासन देत होते. अखेर कंटाळून दानिश टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या मालकाने अझरुद्दीन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
ट्रॅव्हल एजेन्सी मालकाच्या तक्रारीवर औरंगाबाद पोलिसांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी खासदार अझरुद्दीन आणि इतर दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अझरुद्दीन आणि इथर दोघांवर भादंवि कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case Filed Against Mohammad Azharuddin