मुंबई : ऑस्ट्रेलियात (AUS) विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENG) यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे इंग्लंड पराभव केला. डेविड वॉनरने (Devid Warner) चांगली फलंदाजी केली. डेविड वॉनरचा सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्याच्याकडे एका लहान मुलाने जर्शी मागितली होती. जर्शी द्यायचं मान्य केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
दुसऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये स्टीव स्मिथने एक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्टीव स्मिथने उलट्या बाजूने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही, तो थेट विकेटकीपरच्या हातात गेला आहे.
दुसऱ्या मॅचमध्ये स्मिथने इंग्लंडविरुद्ध सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे. 114 बॉलमध्ये 94 धावा त्याने केल्या आहेत. मागच्या काही मॅचमध्ये स्टीव स्मिथने खेळी केल्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. मागच्या चार एकदिवसीय मॅचमध्ये त्याने तीन अर्धशतकी पारी खेळली आहे. विशेष म्हणजे एक शतक सुद्धा स्मिथने लगावलं आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनी, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.
इंग्लंड क्रिकेट टीम : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, सॅम बिलिंग्स, सॅम कुरन, लियाम डॉसन, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, ऑली स्टोन, जेम्स विन्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ल्यूक लाकूड.