मेलबर्न : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर (India Beat Australia 2nd Test Buy 8 Wickets) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने सर्व आघाडींवर चांगली कामगिरी केली. गोलंदाजांची उल्लेखनीय भूमिका राहिली. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) या सामन्यात विश्व विक्रम केला आहे. दिग्गज फिरकीपटूंना न जमलेली कामगिरी अश्विनने करुन दाखवली आहे. (aus vs ind 2nd test 2020 at mcg ravichandran ashwin has dismissed the most left handed batsmen in Test cricket)
अश्विनने या सामन्यातील पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स मिळवल्या. सामन्याचा आजचा चौथा दिवस होता. या चौथ्या दिवशी अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या 2 फलंदाजांना बाद केलं. अश्विनने जोश हेझलवूडला बोल्ड करत दुसरा विकेट मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही गुंडाळला. हेझलवूडच्या या विकेटसह अश्विनने सर्वात जास्त डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्व विक्रम केला.
अश्विनच्या नावे टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 375 विकेट्स आहेत. अश्विनने या 375 पैकी 192 डावखुऱ्या फलंदाजांना बाद केलं आहे.
श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथ्यया मुरलीधरनने कसोटीमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीधरनने या 800 पैकी 191 डावखुऱ्या बॅट्समनना आऊट केलं आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनचा क्रमांक आहे.
अॅंडरसनने 600 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी अँडरसनने 186 डावखुऱ्या फलंदाजांना माघारी पाठवलं आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅक्रगाचा क्रमांक आहे. मॅक्रगाने 563 विकेट्पैकी 172 वेळा डाव्या हाताच्या बॅट्समनना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
तसेच शेन वॉर्नने 708 विकेट्सपैकी 172 विकेट्स हे डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करुन मिळवले आहेत. यानंतर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा क्रमांक लागतो. कुंबळेने 167 डावखुऱ्या फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवलं आहे.
संबंधित बातम्या :
AUS vs IND, 2nd Test | टीम इंडियाच्या विजयाची 5 प्रमुख कारणं
AUS vs IND, 2nd Test : टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने शानदार विजय
(aus vs ind 2nd test 2020 at mcg ravichandran ashwin has dismissed the most left handed batsmen in Test cricket)