मेलबर्न : भारतीय संघाने मेलबर्नवरील दुसऱ्या कसोटीत (Aus vs IND 2nd Test At MCG) ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रहाणेने कर्णधारपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. रहाणेने या सामन्यातील पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. यासह भारताचा विजय पक्का केला. हे असं आम्ही नाही, तर रहाणेची आकडेवारी सांगतेय. आतापर्यंत रहाणेने ज्या सामन्यात शतक लगावलं आहे, तो सामना भारताने गमावलेला नाही. (aus vs ind 2nd Test team india never lost match after ajinkya rahane scored hundred)
पाहा रहाणेची शतकी आकडेवारी
None of Rahane’s previous 11 centuries have come in defeats.
Won 8
Drawn 3
Lost 0He has scored his 12th century today at MCG#AUSvsIND
— Bharath Seervi (@SeerviBharath) December 27, 2020
रहाणेने आतापर्यंत 2014 पासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या संघांविरोधात कसोटीत एकूण 12 शतकं लगावली आहेत. या 12 पैकी 9 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहेत. तर 3 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. तसेच अजिंक्यने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण शतकांपैकी 3 शतकं लगावली. या सामन्यांमध्येही टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे अजिंक्यचे शतक म्हणजे टीम इंडियासाठी विजयाचे संकेत, हे त्याच्या आकडेवारीवरुन सिद्ध होते.
रहाणेने या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात शानदार 112 धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा केल्या. रहाणेला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा बॉक्सिंग डे टेस्ट सामना होता. यामुळे या सामन्यात शानदार कामगिरी केल्याने रहाणेला जॉन मुलघ पदकाने (Johnny Mullagh Medal) सन्मानित केलं गेलं.
बीसीसीआयने अजिंक्यचा मुलघ पदकासह शेअर केलेला फोटो
The proud recipient and the inaugural winner of the Mullagh Medal – #TeamIndia Captain @ajinkyarahane88 #AUSvIND pic.twitter.com/0cBe2icMzz
— BCCI (@BCCI) December 29, 2020
रहाणेने या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अजिंक्यचं मेलबर्नवरील हे दुसरं शतक ठरलं. याआधी रहाणेने 2014 मध्ये मेलबर्नवर शतक लगावलं होत. विशेष म्हणजे हे दोन्ही शतक बॉक्सिंग डे कसोटीत लगावले. अशी कामगिरी करणारा रहाणे एकमेव खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना नववर्षात 7 जानेवारी 2021 ला खेळला जाणार आहे. या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा पुनरागमन करण्याची शक्यता आहे. यामुळे हा तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, हे पाहणं अधिक औत्सुक्याचं राहणार आहे.
संबंधित बातम्या :
Ravichandran Ashwin | अश्विनच्या फिरकीवर भल्याभल्यांची गिरकी, मुरलीधरनचा विक्रम मोडला
AUS vs IND, 2nd Test | टीम इंडियाच्या विजयाची 5 प्रमुख कारणं
AUS vs IND, 2nd Test | रहाणे बडे दिलवाला ! अजिंक्य रन आऊट झाल्यानंतर मैदानात काय झालं? वाचा सविस्तर
(aus vs ind 2nd Test team india never lost match after ajinkya rahane scored hundred)