सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात गुरुवार 7 जानेवारीपासून सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. 4 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra singh Dhoni) विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. (aus vs ind 3 rd test ajinkya rahane have chance to equal ms dhoni record)
विराट कोहली टीम इंडियाचा नियमित कर्णधार. विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला. त्यामुळे अजिंक्यला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. रहाणेने दुसऱ्या सामन्यात आपल्या नेतृत्वात भारताला विजय मिळवून दिला. रहाणेने आतापर्यंत एकूण 3 कसोटींमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. रहाणेच्या नेतृत्वातील या तिन्ही सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. रहाणेला धोनीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
धोनीला अनिल कुंबलेकडून नेतृत्वपदाची जबाबदारी दिली होती. तेव्हा धोनीने टीम इंडियाला सलग 4 कसोटींमध्ये विजय मिळवून दिला होता. यामुळे रहाणेने टीम इंडियाला या सिडनी कसोटीत विजय मिळवून दिल्यास धोनीच्या विक्रमाची बरोबरी होईल. तसेच यासह मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर येईल.
रहाणेला ऑस्ट्रेलियात हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. रहाणेने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत एकूण 797 धावा केल्या आहेत. रहाणेला हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त 203 धावांची आवश्यकता आहे. अशात रहाणेला या तिसऱ्या सामन्यात हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या एकूण 4 फलंदाजांनी ऑस्ट्रेलियामध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
रहाणेला आणखी एक विक्रमी कामगिरी करण्याची संधी आहे. रहाणेला विदेशात 3 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. रहाणे या 3 हजार धावांपासून 109 धावा दूर आहे. रहाणेने ही कामगिरी केल्यास तो नववा भारतीय फलंदाज ठरेल.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार ), रोहित शर्मा ( उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी
संबंधित बातम्या :
Aus vs Ind 3rd Test | सिडनी कसोटीत टीम इंडियाची मदार दोन मुंबईकरांवर
(aus vs ind 3 rd test ajinkya rahane have chance to equal ms dhoni record)