AUS vs IND 3rd Test | रोहित शर्मा आणि मयांक अग्रवालला सलामीला पाठवा, माजी कर्णधाराचा सल्ला

| Updated on: Dec 30, 2020 | 6:27 PM

साधारणपणे विनिगं टीममध्ये बदल केले जात नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात टीम इंडियात काही बदल केले जाणार आहेत. 7 जानेवारी 2021 ला तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळला जाणार आहे.

AUS vs IND 3rd Test | रोहित शर्मा आणि मयांक अग्रवालला सलामीला पाठवा, माजी कर्णधाराचा सल्ला
रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल
Follow us on

सिडनी : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने (India beat Australia By 8 Wickets In 2nd Test) विजय मिळवला. यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यात आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर रोहित शर्माचं संघात पुनरागमन झालं आहे. विजयामुळे तसेच रोहितच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. तसेच टीम इंडियाची बाजू आणखी मजबूत झाली आहे. या मालिकेतील तिसरा सामना नववर्षात म्हणजेच 7 जानेवारी 2021 ला खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. या सामन्याआधी लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टीम इंडियाला महत्वाचा सल्ला दिला आहे. (aus vs ind 3rd test Rohit and Mayank will opening and Shubhaman Gill play middle order say sunil gavskar)

गावसकर काय म्हणाले?

सलग दोन कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही मयांकला संधी द्यावी, अशी गावसकरांची भूमिका आहे. “तिसऱ्या सामन्यात सलामीला रोहितसह मयंक अग्रवालला संधी द्यावी. तसेच शुभमन गिलला मिडल ऑर्डला खेळवावं”, असा सल्ला गावसकर यांनी टीम इंडियाला दिला आहे. टीम इंडियाची दोन्ही सामन्यात निराशाजनक सुरुवात राहिली. पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने निराशाजनक कामगिरी केली. त्याने दोन्ही डावात 0 आणि 4 धावा केल्या. त्यामुळे पृथ्वीला डच्चू देण्यात आला. मात्र मयांकनेही दुसऱ्या कसोटीत पृथ्वीचा कित्ता गिरवला. यामुळे मयंकच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र यानंतरही मयांकला एक संधी देण्याबाबत गावसकर आग्रही आहेत.

“गिलला मधल्या फळीत खेळवावं”

मयांकला रोहितसह सलामीला खेळवल्याने शुभमन गिलला मधल्या फळीत खेळवावं, असं गावसकराचं मत आहे. या तिसऱ्या सामन्यातून हनुमा विहारीला सामन्यातून डच्चू द्यावा, असं गावसकर म्हणाले. गावसकर दुसऱ्या कसोटीनंतर सोनी स्पोर्ट्ससोबत बोलत होते. यावेळेस त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

या कसोटीत मयंकप्रमाणेच हनुमा विहारीलाही या 2 सामन्यांमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या खराब कामगिरीमुळे हनुमावर संघाबाहेर होण्याची टांगती तलवार आहे.

केएल राहुलचं काय ?

केएल राहुलने वर्षभरात दमदार कामगिरी केली. इन फॉर्म असूनही केएलला दोन्ही कसोटीत संधी देण्यात आली नाही. मात्र सू्त्रांनुसार तिसऱ्या सामन्यात हनुमा विहारी आणि मयंक अग्रवालला डच्चू मिळू शकतो. यामुळे विहारीच्या जागी केएलला तिसऱ्या सामन्यात मधल्या फळीत संधी मिळू शकते.

अखेर रोहित परतला

हिटमॅन रोहित आज (30 डिसेंबर) टीम इंडियाशी जोडला गेला. रोहित गेल्या 14 दिवसांपासून सिडनीत क्वारंटाईन होता. हा क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर रोहित टीम इंडियाशी जोडला गेला. सहकाऱ्यांनी रोहितचं जोरदार स्वागत केलं. या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.

बीसीसीआयने रोहितचा ट्विट केलेला व्हिडीओ

तिसरा सामना म्हत्वाचा

या मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना महत्वाचा असणार आहे. हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असेल. मात्र सिडनीतील टीम इंडियाची कामगिरी फारशी चांगली नाही. टीम इंडियाने सिडनीवर अखेरचा सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. त्यानंतर खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोर जावे लागले. तर काही सामने हे अनिर्णित राहिले.

संबंधित बातम्या :

Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज

AUS vs Ind, 3rd Test | स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन

(aus vs ind 3rd test Rohit and Mayank will opening and Shubhaman Gill play middle order say sunil gavskar)