सिडनी : रिषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर. पंत आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही काळापासून पंत मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. पंत कधी फिटनेसवरुन ट्रोल होतो तर कामगिरीवरुन. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (aus vs ind 3rd test) यांच्यात आजपासून (7 जानेवारी) तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात विकेटकीपर पंतने निराशाजनक कामगिरी केली आहे. पंतने या सामन्याच्या पहिल्याच दिवशी चक्क 2 कॅच सोडल्या. तसेच पंतच्या नावावर शर्मनाक विक्रमाची नोंद झाली आहे. (aus vs ind 3rd test wicket keeper rishabh pant sets bad record)
पंत या यादीत आघाडीवर आहे. मात्र नकोशा विक्रमाच्या यादीत पंत आघाडीवर आहे. म्हणजेच पंत सर्वाधिक कॅच सोडणारा खेळाडू ठरला आहे. क्रिकविज या वेबसाईटनुसार, रिषभ पंत 2018 पासून खेळलेल्या प्रत्येक कसोटीत 0.86 सरासरीने कॅच सोडल्या आहेत. म्हणजेच पंतने प्रत्येक सामन्यात किमान 1 कॅच सोडला आहे. 2018 पासून जितक्या विकेटकीपर्सनी 10 कसोटी खेळले आहेत, त्यांच्या तुलनेत पंतची आकडेवारी ही सर्वात खराब आहे. सिडनी कसोटी सामन्याचा आता एक दिवस संपला आहे. त्यात आतापर्यंत पंतने एकूण 2 कॅचेस सोडल्या आहेत. त्यात अजून ऑस्ट्रेलियाचा पहिला डावातील 8 विकेट्स बाकी आहेत. यामुळे पंतने अशीच कामगिरी केली, तर याचा गंभीर परिणाम टीम इंडियाला भोगावा लागेल.
Since the start of 2018, Rishabh Pant averages 0.86 dropped catches per Test played.
Of all keepers to play 10 matches in that time, Pant's drops-per-Test record is the worst.#AUSvIND
— The CricViz Analyst (@cricvizanalyst) January 7, 2021
या सिडनी कसोटीत पंतने एकाच फलंदाजाच्या 2 कॅच सोडल्या. अवघ्या 10 मिनिटांमध्ये 2 कॅच सोडल्या. यापैकी एक कॅच हा काही प्रमाणात अवघड होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा कॅच पकडणं अपेक्षित असतात. टीम इंडियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोव्हस्कीने पदार्पण केलं. पंतने या पुकोव्हस्कीच्या दोन कॅच सोडल्या. यामुळे विल पुकोव्हस्कीने अर्धशतकी खेळी केली. पंतने पहिला कॅच 26 तर दुसरा कॅच 32 धावावंर सोडला. पुकोव्हस्कीने 62 धावांची खेळी केली. अर्थात पंतचं कॅच सोडणं टीम इंडियाला 30 धावांनी महाग ठरलं.
पंतच्या या अशा कामगिरीमुळे टीम इंडियाचे चाहते फार संतापले आहेत. पंत वारंवार अशा चुका करतोय. पंतने अशीच कामगिरी केली तर ते टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे पंतला संघाबाहेर बसवावं, या मागणीचे ट्विटही केले जात आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसखेर 2 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन 67 धावांवर नाबाद आहे. तर विल पुकोव्हस्कीने 62 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
संबंधित बातम्या :
AUS vs IND 3rd Test | पंतचं ढिसाळ क्षेत्ररक्षण, पुकोव्हस्कीला 2 जीवनदान, सोशल मीडियावर ट्रोल
(aus vs ind 3rd test wicket keeper rishabh pant sets bad record)