ब्रिस्बेन : रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (Aus vs Ind 4th Test) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने बॉर्डर गावसकर मालिका (Border Gavskar Trophy) जिंकली. रिषभ पंत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. सामना रंगतदार स्थितीत असताना रिषभ पंतने (Rishabh Pant ) निर्णायक भूमिका बजावली. पंतने नाबाद 89 धावांची विजयी खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून व्हिलन ठरलेला पंत या शानदार खेळीमुळे हिरो ठरला आहे. पंतचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. (aus vs ind 4th test Rishabh Pant appreciation from netizens on social media)
Yesterday he was singing Spiderman Spiderman. Today he did a Spiderman ??.
Pant ?❤️#AUSvIND pic.twitter.com/YZF0Zvu0GP— Circuit ? Expert (@Being_circuit) January 19, 2021
The way Ravi Shastri hugged Rishabh Pant. This is absolutely gold moment, trusting the 23-Year old guy and he takes India home. pic.twitter.com/ajgQ6KRnNl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 19, 2021
Rishabh pant in last 10 overs #GabbaTest #INDvsAUS #RishabhPant pic.twitter.com/shrrkTKX5x
— Rusty Tech (@rusty_tech) January 19, 2021
पंतने या कसोटी मालिकेत किंपींग करताना ऑस्ट्रेलियाच्या अनेक फलंदाजांच्या सोप्या कॅच मिस केल्या होत्या. याचा फायदा घेत त्या फलंदाजांनी मोठी खेळी केली. यामुळे पंतला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोर जावं लागलं. मात्र पंतने या ट्रोलिंगबाबत एक शब्दही काढला नाही. पंतने या ट्रोल गँगना आपल्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिलं.
सामना ऐन रंगतदार स्थितीत होता. पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदरसह महत्वपूर्ण भागदीरी केली. या दरम्यान त्याने अर्धशतकही लगावलं. एकाबाजूला टीम इंडियाचे विकेट्स जात होते. सामना रोमांचक स्थितीत पोहचला होता. मात्र पंतने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. पंतने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. पंतने 138 चेंडूंमध्ये 9 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 89 धावांची खेळी केली.
दरम्यान या मालिका विजयानंतर टीम इंडियासह रिषभ पंतचे कौतुक केलं जात आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 5 कोटीचे बोनस जाहीर केलं आहे.
संबंधित बातम्या :
(aus vs ind 4th test Rishabh Pant appreciation from netizens on social media)