ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी (Aus vs Ind 4th Brisbane Test) सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आपल्या पहिल्या डावात 23 धावांवर बाद झाला. यासह पंतची एक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली. पंतला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र ही संधी अवघ्या 1 धावेने हुकली. (aus vs ind 4th test rishabh pant missed an opportunity to break mahendra singh dhoni record in test cricket)
पंतने कसोटी सामन्यांमध्ये एकूण 26 डावात 976 धावा केल्या आहेत. कसोटीत बॅटिगं करण्याची ही पंतची ही 27 वी (27 वा डाव) वेळ होती . पंतला ऑस्ट्रेलियाविरोधात हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 24 धावांची आवश्यकता होती. मात्र ही संधी अवघ्या 1 धावेने हुकली. त्यामुळे पंतच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीमध्ये 999 धावांची नोंद झाली आहे.
Cameron Green said he's never been a gully fielder … well, he's not getting out of there any time soon!
Live #AUSvIND: https://t.co/IzttOVtrUu pic.twitter.com/mdIo6lDGYp
— cricket.com.au (@cricketcomau) January 17, 2021
पंत 23 धावांवर खेळत होता. पंत मैदानात सेट झाला होता. त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. गोलंदाज जोश हेझलवूड गोंलदाजी करायला आला. पंत हजार धावांच्या टप्प्याच्या उंबरठ्यावर होता. हेझलवूडच्या चेंडूवर पंतने फटका मारला. हा मारलेला फटका कॅमरॉन ग्रीनच्या दिशेने गेला. ग्रीनने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. यामुळे पंतची धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली.
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या मोजक्याच विकेटकीपर फलंदाजांनी हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आणि फारुख इंजिनिअर या दोघांनीच आतापर्यंत अशी कामगिरी केली आहे.
कसोटीत धोनीने 32 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर फारुख इंजिनियर यांनी 36 डावात हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. पंतने ऑस्ट्रेलियाविरोधातील या सामन्यात आणखी एक धाव केली असती तर त्याच्या हजार धावा पूर्ण झाल्या असत्या. यासह तो टीम इंडियाकडून कमी डावात वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा विकेटकीपर फलंदाज ठरला असता. दरम्यान आता पंतला या सामन्याच्या दुसऱ्या डावात (एकूण 27वा डाव) ही कामगिरी करण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या :
(aus vs ind 4th test rishabh pant missed an opportunity to break mahendra singh dhoni record in test cricket)