ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेन येथे बॉर्डर गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा कसोटी सामना (AUS Vs IND 4th Test) खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील या सामन्यातून थंगारासू नटराजन (T Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या जोडीने कसोटी पदार्पण केलं. या दोघांनी पदार्पणातील सामन्यात अफलातून कामगिरी केली आहे. या जोडीने क्रिकेटमध्ये 72 वर्षानंतर विक्रमी कामगिरी केली आहे. (aus vs ind 4th test t natrajan and washington sunder makes record after 72 year in debut match)
टीम इंडियाचे बरचशे खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे या दोघांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या दोघांनी पहिल्या डावात गोलंदाजी करताना प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. नटराजनने 78 तर वॉशिंग्टन सुंदरने 89 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यासह या जोडीने क्रिकेटमध्ये 72 वर्षांनंतर कारनामा केला आहे.
आयसीसीने केलेलं ट्विट
✅ Two Test debutants
✅ Two three-wicket haulsNicely done, @Sundarwashi5 and @Natarajan_91! ?#AUSvIND | https://t.co/oDTm20rn07 pic.twitter.com/kqifFEyMUq
— ICC (@ICC) January 16, 2021
पदार्पणातील कसोटीत गोलंदाजांनी एकाच सामन्यात प्रत्येकी 3 विकेट्स घेण्याची ही दुसरीच घटना आहे. याआधी टीम इंडियाकडून अशी कामगिरी 1948-49 मध्ये करण्यात आली होती. मंटु बॅनर्जी आणि गुलाम अहमद या जोडीने 1948-49 मध्ये वेस्टइंडिजविरोधात कसोटी पदार्पण केलं होतं. हा सामना कोलकातामध्ये खेळण्यात आला. या कसोटीत या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 3 वा त्यापेक्षा विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. या जोडीने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या होत्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. टीम इंडियाने 62 धावा करुन 2 विकेट्स गमावल्या. रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. तर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला. दरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. टीम इंडिया दुसऱ्या दिवसखेर 307 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 369 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दूल ठाकूर या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतला.
संबंधित बातम्या :
Aus vs Ind 4th Test | वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’, पदार्पणातील सामन्यात विक्रमाला गवसणी
(aus vs ind 4th test t natrajan and washington sunder makes record after 72 year in debut match)