ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना (Aus vs Ind 4th Test) खेळण्यात येत आहे. या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) या अष्टपैलू खेळाडूने कसोटी पदार्पण केलं. पदार्पणातील सामन्यात आपण उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. मात्र ती इच्छा प्रत्येक खेळाडूची पूर्ण होतेच असं नाही. पण वॉशिंग्टन याला अपवाद आहे. वॉशिग्टंनने फक्त चांगली कामगिरीसह रेकॉर्ड ब्रेक खेळी केली आहे. वॉशिंग्टनने 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (aus vs ind 4th test washington sundar break 19 years old record)
वॉशिंग्टनचा हा पदार्पणातील सामना. पण त्याने सराईत गोलंदाजासारखी बोलिंग केली. टीम इंडियाच्या नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 369 धावांवर गुंडाळला. या 10 पैकी 3 विकेट्स वॉशिंग्टनने घेतल्या वॉशिंग्टनने एकूण 31 ओव्हरमध्ये 89 धावा देत महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने स्टीव्ह स्मिथ, कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लायन अशा महत्वाच्या 3 विकेट्स घेतल्या.
पदार्पणातील सामन्यात 3 विकेट्स घेतल्या यात विशेष काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र ब्रिस्बेनवर तब्बल 19 वर्षानंतर फिंगर स्पीनरने 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. वॉशिंग्टनने 3 विकेट्स घेत इंग्लंडच्या एश्ले जाईल्सचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जाईल्सने 2002 मध्ये 101 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
वॉशिंग्टनने बोलिंगने आपली भूमिका जबाबदारीने पार पाडली आहे. आता वॉश्गिंटनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे वॉश्गिंटनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 369 धावांवर ऑल आऊट केलं. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावातील फलंदाजाली सुरुवात केली. भारताने चहापानापर्यंत 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या. मात्र यानंतर ब्रिस्बेनमध्ये पाऊस सुरु झाला. दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
Australia vs India, 4th Test, 2nd Day Live : पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला
(aus vs ind 4th test washington sundar break 19 years old record)