ब्रिस्बेन : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Team India vs Australia) यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) खेळण्यात येणार आहे. ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचे नियम अत्यंत कडक आहेत. या कडक नियमांमुळे टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटी खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त होते. यावरुन चांगलाच वादही निर्माण झाला. नियमांनुसार खेळायचं असेल तरच या, असा धमकीवजा इशारा क्वीसलॅंडच्या शेडो आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी दिला. या सर्व प्रकरणावरुन ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका मांडली आहे. (aus vs ind australia cricket board big statement on Brisbane Test )
टीम इंडिया ब्रिस्बेनमध्येस खेळण्यास तयार नसल्याचं वृत्ताचं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने खंडन केलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे निक हॅकले (Nick Hockley) यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत. तसेच टीम इंडिया अपेक्षित सहकार्य करत आहे. दोन्ही संघ नियोजित वेळापत्रकानुसार चौथा सामना खेळण्यास तयार आहेत, अशी प्रतिक्रिया निक हॅकले यांनी दिली.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचे नियम अत्यंत कडक आहेत. या कडक नियमांमुळे टीम इंडियाच नकार आहे. टीम इंडियाचे खेळाडू आधीच आयपीएलनिमित्त दुबईत क्वारंटाईन राहिले. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाही क्वारंटाईन होते. आम्ही आता पुन्हा क्वारंटाईन राहणार नाहीत. क्वारंटाईन कालावधीनंतर आम्हाला ऑस्ट्रेलियात सामान्य नागरिकांनुसार फिरण्याची मुभा मिळेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. आता पुन्हा आम्हाला क्वारंटाईन राहायचं नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या हवाल्याने दिली.
या सर्व प्रकरणावरुन गेल्या 2 दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र आता ऑस्ट्रेलिया बोर्डाने स्पष्टीकरण दिल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाले आहे. मात्र बीसीसीआयकडून अजूनही कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना 7 जानेवारीला सिडनीमध्ये खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनीमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.
बॉर्डर गावसकर मालिकेतील आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे तिसरा सामना अटीतटीचा होणार आहे.
संबंधित बातम्या :
(aus vs ind australia cricket board big statement on Brisbane Test )