Special Story | India Tour Australia | पराभवाने सुरुवात, मग दमदार पुनरागमन, वर्षाचा विजयी शेवट आणि दुखापतीचं ग्रहण

| Updated on: Jan 03, 2021 | 10:18 AM

एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. टीम इंडियाने टी 20 मालिका जिंकून एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा घेतला. तर 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे.

Special Story | India Tour Australia | पराभवाने सुरुवात, मग दमदार पुनरागमन, वर्षाचा विजयी शेवट आणि दुखापतीचं ग्रहण
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा
Follow us on

कॅनबेरा : आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या समारोपानंतर काही दिवसांनी 27 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (india tour australia 2020-21) सुरुवात झाली. विराट कोहलीच्या (virat kohli) नेतृत्वात टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात पराभवाने झाली. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा पहिल्या 2 सामन्यात पराभव झाला. यामुळे तिसऱ्या सामन्यात प्रश्न अस्तित्वाचा होता. टीम इंडियाने या तिसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली. तिसरा सामना जिंकत टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड केला. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. (aus vs ind Team Indias tour of Australia Performance in 2020-21)

टी 20 मालिका

टीम इंडियाने टी 20 मालिकेत शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने वनडे मालिकेतील वचपा टी 20 मध्ये घेतला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले. तर कांगारुंनी तिसरा टी 20 सामना जिंकला. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली.

विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी

या टी 20 मालिकेसह टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात त्यांच्याच भूमित तिन्ही फॉर्मेटमध्ये मालिका (टी 20, वनडे आणि कसोटी) जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिन्ही विजयी मालिकेतील आकडेवारी

टी 20 मालिका ,2020-21, टीम इंडिया 2-1
एकदिवसीय मालिका 2018-19, टीम इंडिया 2-1
कसोटी मालिका, 2018/2019, टीम इंडिया 2-1

सराव सामने अनिर्णित

कसोटी मालिकेच्या पार्श्ववभूमीवर दोन्ही संघात टी 20 मालिकेदरम्यान एक आणि त्यानंतर एक असे 2 सराव सामने खेळण्यात आले. हे दोन्ही सामने अनिर्णित राहिले. या सराव सामन्यातही टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.

टीम इंडियाची ‘कसोटी’

एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाने कांगारुंवर मात केली. यामुळे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक मालिका जिंकली होती. यामुळे कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातवरण होतं. पहिला कसोटी सामना हा अ‍ॅडिलेड ओव्हल येथे खेळण्यात आला. हा डे नाईट सामना होता. तसेच या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला होता.

कांगारुंसमोर टीम इंडियाने पहिल्या कसोटीत अक्षरक्ष: शरणागती पत्कारली. भारतीय खेळाडूंनी ढिसाळ क्षेत्ररक्षण, अपयशी गोलंदाजी आणि निराशाजनक फलंदाजी केली. या चुका भारताला महागात पडल्या. टीम इंडियाने या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीने लाज घालवली.

भारताने एकामागोमाग एक विकेट गमावले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. तसेच भारताने 9 विकेट गमावले होते. यामुळे टीम इंडियाला दुसरा डाव 36 धावांवर घोषित करावा लागला. यामुळे कांगारुंना विजयासाठी 70 धावांचे माफक आव्हान मिळाले. कांगारुंनी हे विजयी आव्हान यशस्वीरित्या पार पाडले. यासह ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

दुखापतग्रस्त टीम इंडिया

आयपीएलच्या 13 व्या मोसमात इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाले. दोघांना आयपीएलला मुकावे लागले. मोठ्या प्रतिक्षेनंतर इशांत दुखापतीतून सावरेल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र इशांतला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर व्हावे लागले. यानंतर पहिल्या सामन्यात मोहम्मद शमी बॅटिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाला. यामुळे टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.

संबंधित बातम्या :

चेतेश्वर पुजाराचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंता वाढवणारा, माजी गोलंदाजाचा तिसऱ्या मॅचपूर्वी थेट इशारा

AUS vs IND 3rd Test | रोहित शर्मा आणि मयांक अग्रवालला सलामीला पाठवा, माजी कर्णधाराचा सल्ला

(aus vs ind Team Indias tour of Australia Performance in 2020-21)