दुबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Aus vs IND 2nd Test) दुसऱ्या कसोटीत 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला या पराभवासह दुहेरी झटका बसला आहे. आयसीसीने (ICC) ऑस्ट्रेलियाला ओव्हर रेट कायम न राखल्याने दंड ठोठावला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील 4 अंकही कापले आहेत. यासह आयसीसीने ऑस्ट्रेलियाने कांगारुंना दुहेरी दणका दिला आहे. (aus vs ind test series 2020 icc australia get fined for maintaining a slow over rate against india in 2nd test)
ऑस्ट्रेलियाने या दुसऱ्या कसोटीत अपेक्षित ओव्हर रेट कायम राखला नाही. यामुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियाला एकूण मानधनाच्या 40 टक्के दंड ठोठावला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही सामन्यात ठराविक वेळेत ओव्हर पूर्ण अपेक्षित असतं. मात्र तसं न झाल्यास आयसीसीकडून अशी कारवाई करण्यात येते . ऑस्ट्रेलियाने निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या. यामुळे आयसीसीचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी ही कारवाई केली आहे.
आयसीसीने केलेलं ट्विट
Australia lose four ICC World Test Championship points and get fined 40% of their match fee for maintaining a slow over-rate against India in the second #AUSvIND Test.
More ? https://t.co/0hXoePpqel pic.twitter.com/WFCTvnkus6
— ICC (@ICC) December 29, 2020
आयसीसीच्या 2.22 या नियमांनुसार ही कारवाई केली आहे. ओव्हर रेट कायम न राखल्यास या नियमामध्ये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही सामन्याच्या एकूण मानधनाच्या 20 टक्के रक्कम ही दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाचे एकूण 4 पॉइंट्स कापले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 16.11.2 या नियमानुसार स्लो ओव्हर रेटमुळे 2 गुण पॉइंट्स कमी करण्याची तरतूद आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला एकूण 4 पॉइंट्सचे नुकसान झाले आहे. मात्र या नंतरही ऑस्ट्रेलिया या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
साधारणपणे स्लो ओव्हर रेटमुळे संबंधित संघाच्या कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. मात्र कर्णधार टीम पेनने आपली चूक मान्य केली आहे. तसेच तो दंड देण्यासही तयार झाला आहे. यामुळे आयसीसीला औपचारिक सुनावणी केली नाही, असं आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं.
तिसरा सामना नियोजित वेळापत्रकानुसार सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे, याबातची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 29 डिसेंबरला दिली. गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले होते. यामुळे तिसरा सामना सिडनीत होणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र ऑस्ट्रेलिया बोर्डाने दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे .
संबंधित बातम्या :
रवींद्र जाडेजा टीम इंडियाचा नवा संकटमोचक, सध्याच्या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू
भारताच्या भेदक माऱ्याला आमचे फलंदाज घाबरले, रिकी पॉन्टिंगचा स्ट्रेट ड्राईव्ह
Australia vs India | ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा तिसऱ्या कसोटीबाबत मोठा निर्णय
(aus vs ind test series 2020 icc australia get fined for maintaining a slow over rate against india in 2nd test)