aus vs india | टीम इंडिया सिडनीमध्ये दाखल, हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई

| Updated on: Jan 04, 2021 | 7:01 PM

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया सिडनीमध्ये पोहचली आहे. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

aus vs india | टीम इंडिया सिडनीमध्ये दाखल, हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई
Follow us on

सिडनी : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना सिडनीत (Sydney) खेळण्यात येणार आहे. ही तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया सिडनीमध्ये पोहचली आहे. सिडनीमध्ये पोहचल्यानंतर टीम इंडियाला कोरोना नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. या नियमांनुसार टीम इंडियाच्या खेळाडूंना हॉटेलमध्येच रहावे लागणार आहे. म्हणजेच त्यांना हॉटेलमधून बाहेर पडता येणार नाही. (aus vs ind test series team india not allowed out of hotel except practice session 3rd Sydney Test)

सिडनीत टीम इंडियाला केवळ सरावासाठीच हॉटेलमधून बाहेर पडता येणार आहे. याशिवाय इतर कोणत्याही कारणाने खेळाडूंना बाहेर पडता येणार नाही. सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यात काही दिवसांपू्र्वी टीम इंडियाचे खेळाडू जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा काही गडबड होऊ नये, म्हणून खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची काळजी घेतली जात आहे. खेळाडू्ंना कोणताही धोका उद्भवू नये यासाठी त्यांना बायोबबलमध्ये ठेवले जात आहे. तसेच कोणत्याही दौऱ्या आधी पाहुण्या संघाला क्वारंटाईन केले जाते आहे.

केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच संधी

खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू ,सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

सिडनीवरील हेड टु हेड कामगिरी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाने हा एकमेव सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India 3rd test | मिशन ‘अजिंक्य’, सिडनी कसोटीत रहाणेला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लॅन

Sydney Test | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, स्टेडियममध्ये मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश

(aus vs ind test series team india not allowed out of hotel except practice session 3rd Sydney Test)