AUS vs IND, 2nd Test | रहाणे बडे दिलवाला ! अजिंक्य रन आऊट झाल्यानंतर मैदानात काय झालं? वाचा सविस्तर

| Updated on: Dec 28, 2020 | 6:38 PM

रहाणेने शानदार शतकी खेळी केली. मात्र जाडेजाच्या चुकामुळे रहाणे धावबाद झाला. रहाणेचं मेलबर्नवरील हे दुसरं शतक ठरलं.

AUS vs IND, 2nd Test | रहाणे बडे दिलवाला ! अजिंक्य रन आऊट झाल्यानंतर मैदानात काय झालं? वाचा सविस्तर
रहाणे 112 धावांवर जाडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे रन आऊट झाला.
Follow us on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीवर टीम इंडियाने (Australia vs india 2nd test) घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. यामुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कसोटी मालिकेत नेतृत्वाची संधी मिळाली.अजिंक्यने या संधीचं सोनं केलं. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने टीम इंडिया पिछाडीवर पडली. मात्र दुसऱ्या सामन्यात रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं आहे. त्यासाठी रहाणेच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जात आहे. यासह आणखी एका कारणाने रहाणेने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. (aus vs india 2nd test 2020  What happened after Ajinkya Rahane was run out)

नक्की काय झालं?

साधारणपणे सहकारी फलंदाजामुळे रनआऊट व्हाव लागलं तर बाद खेळाडूच्या रोषाचा सामना करावा लागतो. विराट कोहली तर अक्षरक्ष आगपाखडच करतो. मात्र कर्णधार म्हणून रहाणे याला अपवाद आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. रहाणे आणि जाडेजा मैदानात होते. टीम इंडिया चांगल्या स्थितीत होती. टीम इंडियाला मोठ्या आघाडीची अपेक्षा होती.

जाडेजाला अर्धशतकासाठी एका धावेची गरज होती. नॅथन लायन गोलंदाजी करत होता. जाडेजाने शॉर्ट कव्हरच्या दिशेने फटका मारला. जाडेजाने अजिंक्यला धावेसाठी कॉल दिला. जाडेजाच्या कॉलला रहाणेने साद दिली. रहाणे धाव घेण्यासाठी धावला.

मात्र शॉर्ट कव्हरला असलेल्या मार्नस लाबुशानेने विकेटकीपर टीम पेनकडे थ्रो केला. परिणामी रहाणे रन आऊट झाला. मात्र रहाणे जाडेजावर संतापला नाही.

जाडेजाला बाद घोषित केलं. बाद झाल्यानंतर रहाणे जाडेजाजवळ गेला. जाडेजाने शर्मेने मान खाली घातली. मात्र रहाणेने त्याला प्रोत्साहन दिलं. यासह रहाणे मैदानाबाहेर पडला. या कृतीमुळे रहाणेचं कौतुक होतंय.

रहाणेला धावबाद देण्यावरुन वादंग

रहाणेला धावबाद दिल्याने टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. रहाणेला रन आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्याचे कारणही तसेच आहे. ज्या प्रकारे रहाणे रन आऊट झाला त्याच प्रकारे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधारही आऊट होता. मात्र थर्ड अंपायरने निर्णय देताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप नेटीझन्सकडून केला जात आहे.

नियमांनुसार फलंदाजाची बॅट ही क्रीजमध्ये असायला हवी. मात्र पेनची बॅट बाहेर असूनही त्याला नाबाद घोषित करण्यात आलं. यामुळे सोशल मीडियावर नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं.

रहाणेसोबत थर्ड अंपायरचा पक्षपातीपणा

टीम इंडियाची घट्ट पकड

टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 133 धावा केल्या आहेत. कांगांरुनी 2 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

गोलंदाजांनी कांगारुंच्या 4 खेळाडूंना झटपट माघारी धाडलं तर टीम इंडियाला विजयासाठी माफक आव्हान मिळेल. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्याची संधीही मिळेल. यामुळ चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीवरव सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs IND, 2nd Test | रहाणेचं झुंजार शतक, स्टीव्ह स्मिथकडून रिसपेक्ट ! वाचा काय घडलं?

Ind Vs Aus : रहाणेची ‘विराट’ कामगिरी, दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंगचं मोठं वक्तव्य

(aus vs india 2nd test 2020  What happened after Ajinkya Rahane was run out)