मेलबर्न : हॉटेलमध्ये जेवण करणं टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना चांगलंच अंगाशी आलं आहे. टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिलचा समावेश होता. या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. यामध्ये त्यांनी बीफही खाल्ल्याचा दावा केला जातोय. यामुळे खेळाडूंना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.(aus vs india test series rohit sharma rishabah pant shubhaman gill prithvi shaw are troll on social media due to beef lunch bill)
टीम इंडियाचे पाच खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे नवलदीप सिंह नावाचा क्रिकेट चाहता होता. त्याने या खेळाडूंना पाहून फोटो काढण्याची विनंती केली. ही विनंती या खेळाडूंनी मान्य केली. खेळाडूंनी सोबत फोटो काढल्याने नवलदीप खूश झाला. त्याच्या आनंदाला पारावा राहिला नाही. आनंदाच्या भरात नवलदीपने टीम इंडियाच्या 5 खेळाडूंच्या जेवणाचं बिलही भरलं. यानंतर या नवलदीपने जेवणाचं बिल आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे या खेळाडूंचा बाजार उठला.
नवलदीपने शेअर केल्या जेवणाच्या बिलाच्या फोटोमध्ये बीफचा स्पष्ट उल्लेख दिसतोय. यावरुन टीम इंडियाच्या ट्रोल केलं जात आहे. अनेक मीम्सद्वारे खेळाडूंना ट्रोल केलं जात आहे. यामध्ये रोहित शर्माला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यामुळे रोहित ट्विटरवर ट्रेंड झाला आहे.
पाहा ट्विटस
Showing animal loves & giving gyan on Hindu Festivals
on the other hand eating #beef in a chines Restaurant
what a Hypocrisy #RohithSharma pic.twitter.com/SjeFUHwilm— Bacchan Pandey (@Bachchanpandey_) January 3, 2021
#Beef is banned in India but can be eaten in another country ??
The five Hindu cricketers who have been seen eating beef, @iArmySupporter have today given proof to all five of them being fake Hindus. ?#RohithSharma #RishabhPant pic.twitter.com/U1rtVi34p9
— ?????? ???? ? (@True_Indian8) January 3, 2021
#beef #beef #RohithSharma #IndianCricketTeam #viratkholi
After the Indian Hindu cricketers eat beef .
Le bhakts and sanghis be like: pic.twitter.com/bZfS7uKWEA— Mohmmed Altaf (@Altaf_P7) January 3, 2021
*when #RohithSharma is eating at the restaurant and suddenly he sees a Sardar ji with bill* #beef pic.twitter.com/svsqXircYr
— Corona Warrior (@corona_warrior) January 3, 2021
Meanwhile, #RohithSharma waiting for sardarji who paid the bill outside the restaurant!! #beef #IStandWithRohit pic.twitter.com/KD73b8i25B
— Emraan khan (@EpicEmraan) January 3, 2021
#beef
Fans trying to figure out to eats the beef pic.twitter.com/ukEyyMxm9f— Piyush Sharma (@PiyushS27106635) January 3, 2021
एका बाजूला रोहितला ट्रोल केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला काही समर्थक रोहितच्या पाठी ठामपणे उभे आहेत. ट्विटरवर रोहितच्या बाजूने ट्विटही केले जात आहेत. त्यामुळे ट्विटरवर #IStandWithRohit हा हॅश्टॅग ट्रेंड होत आहे.
या खेळाडूंनी बाहेर जेवण केलं. यामुळे या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाच्या वैदयकीय पथकाच्या सल्ल्यानुसार आयसोलेट करण्यात आले आहे. या खेळाडूंमुळे इतर खेळाडूंना काही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झालं का, याबाबतही आता चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी सिडनीमध्ये 7 जानेवारीला खेळण्यात येणार आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे.
संबंधित बातम्या :
AUS vs IND Test Series | हिटमॅन रोहित शर्मासह टीम इंडियाचे अन्य 4 खेळाडू आयसोलेट
(aus vs india test series rohit sharma rishabah pant shubhaman gill prithvi shaw are troll on social media due to beef lunch bill)