मुंबई : ऑस्ट्रेलिया (AUS) आणि वेस्ट इंडिज (WI) यांच्यातील पर्थच्या मैदानात कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याला अचानक त्रास जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज कसोटीचा तिसरा दिवस होता. रिकी पॉटिंग एका खासगी चॅनेलसाठी कॉमेंट्री करत होता. त्याला अचानक हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी रिकी पाँटिंगला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे तो पुन्हा त्या सामन्यात कॉमेंट्री करताना दिसला नाही अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 283 धावांत रोखले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया टीमने 4 गडी गमावून 598 धावा करून डाव घोषित केला होता.
रिकी पॉटिंगने ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळत असताना अनेक रेकॉर्ड केले आहेत. ऑस्ट्रेलिया टीमसाठी कर्णधार असताना सुद्धा अनेक मालिका जिंकून दिल्या आहेत. तसेच तिन्ही फॉरमॅटमधील क्रिकेट त्याने खेळले आहे. टीम इंडियामध्ये होत असलेल्या आयपीएलच्या टीममध्ये सुद्धा खेळला आहे. आता आयपीएलमधील एका टीमसाठी प्रशिक्षक आहे.