सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील एकदिवसीय (One Day Match) आणि टी ट्वेन्टी (T 20 Match) मालिकेनंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला (India Vs Australia test match) सुरुवात होत आहे. त्याअगोदर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) पहिल्या कसोटीला मुकणार आहे. दुखापतीमुळे त्याला पहिली कसोटी खेळता येणार नाही. (Australia David Warner out of Adelaide test Against team India)
भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय मॅचदरम्यान फिल्डिंग करताना डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला तात्काळ मॅचमधून बाहेर जावं लागलं होतं. पहिल्या कसोटी मॅचपर्यंत तो पूर्णपणे बरा होऊ शत नसल्याने तो दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
17 डिसेंबरला अॅडलेडमध्ये होणारा पहिला कसोटी सामना डे नाईट असणार आहे. तर 26 डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. वॉर्नर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नसल्याचं आयसीसीने ट्विट करुन सांगितलं आहे.
JUST IN: David Warner has been ruled out of the first #AUSvIND Test at Adelaide with an injury to his adductor muscle.
Australia are confident that he’ll regain fitness ahead of the second Test in Melbourne. pic.twitter.com/itZbn0UL21
— ICC (@ICC) December 8, 2020
“इतक्या कमी वेळेत मी तंदुरुस्तीच्या दिशेने पावलं टाकतोय. माझ्यासाठी हीच गोष्ट चांगली असेल की इथेच सिडनीमध्ये थांबून माझी तब्येत लवकरात लवकर कशी सुधारेल याकडे लक्ष द्यावं की ज्यामुळे मी पूर्णपणे बरा होईल”, असं आयसीसीच्या ट्विटनंचर डेव्हिड वॉर्नरने म्हटलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच डे नाईट मॅच खेळणार आहे. ही मॅच दोन्ही संघ पिंक (गुलाबी) बॉलने खेळतील. अशातच पहिल्या कसोटीत वॉर्नर खेळणार नाही, हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असणार आहे.
(Australia David Warner out of Adelaide test Against team India)
संबंधित बातम्या
Ind Vs Aus 2020 : तिसऱ्या टी-ट्वेन्टीत भारताची धीम्या गतीने बोलिंग, मॅच रेफ्रीने ठोठावला दंड
Ind Vs Aus : भारताविरुद्ध डे नाईट प्रॅक्टिस मॅचसाठी ऑस्ट्रेलिया A टीम घोषित, पाहा कोणाकोणाचा समावेश?