ऑस्ट्रेलिया (Australiya) आणि न्यूझिलंड (New Zealand) यांच्यात वनडे साखळी सामने सुरु आहे. दोन्ही संघातील संघात दुसरा सामना सुरु असल्याना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांच्यावरती लाईव्ह मॅचमध्ये मागून हल्ला झाला. हा हल्ला न्यूझिलंडच्या एका खेळाडू कडून झाला आहे. ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेल एका धावेसाठी धावत होता. त्यावेळी त्यांच्या मागून आलेला बॉल त्यांच्या कंबरड्यात जोरात लागला. त्यामुळे त्याला अधिक त्रास झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तो व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर अधिक चर्चेचा ठरला आहे.
What a pain in the butt ?#AUSvNZ pic.twitter.com/tXc2bW1RHy
हे सुद्धा वाचा— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2022
नीशाम असं न्यूझिलंडच्या खेळाडूचं नाव होतं. त्याने मारलेला थ्रो थेट ग्लेन मॅक्सवेलच्या पाठीत लागला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला प्रचंड त्रास झाल्याने स्टेडियम एकदम शांत झालं होतं.
दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना ग्लेन मॅक्सवेलने 50 चेंडूत 25 धावा केल्या आहेत. झालेल्या सामन्यात त्याला दोनदा जीवनदान मिळाले परंतु त्याचा त्याला फायदा झाला नाही.