India vs Australia Live Streaming: रांची : तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी मात केली. कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकानंतरही भारताला पराभाव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, विराट वगळता कुणालाही चांगली खेळी करता आली नाही, परिणामी भारताने केवळ 281 धावांपर्यंत मजल मारली आणि पराभव स्वीकारला.
ऑस्ट्रेलियाने सलामीवर उस्मान ख्वाजाचं शतक आणि कर्णधार अॅरॉन फिंचच्या 93 धावांच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डे सामन्यात भारतासमोर 314 धावांचं भलंमोठं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 5 बाद 313 अशी मजल मारली. उस्मान ख्वाजाने 113 चेंडूत 104 तर कर्णधार अॅरॉन फिंचने 99 चेंडूत 93 धावा ठोकल्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वन डे सामना धोनीच्या झारखंडमधील रांची इथं झाला. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या ख्वाजा आणि फिंचने पहिल्या विकेटसाठी तब्बल 193 धावांची सलामी दिली. या दोघांची जोडी फोडताना भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. पहिल्या विकेटसाठी भारताला तब्बल 31 षटकं वाट पाहावी लागली. 32 व्या षटकात कुलदीप यादवने फिंचला पायचित बाद केलं. त्यामुळे भारताला मोठा आधार मिळाला. फिंचचं शतक 7 धावांनी हुकलं.
यानंतर मग मोहम्मद शमीने ख्वाजाला बुमराहकरवी झेलबाद केलं. ख्वाजा बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलिया 2 बाद 239 अशा भक्कम स्थितीत होती. 31 चेंडूत 47 धावा करणारा स्फोटक फलंदाज मॅक्स्वेल चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. शॉन मार्श 7 आणि पीटर हॅण्डस्कॉम्ब 0, या दोघांनाही कुलदीपने माघारी धाडलं.
भारताकडून कुलदीप यादवने 3 आणि शमीने 1 विकेट घेतली. अन्य कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही.
आर्मी कॅप घालून टीम इंडिया मैदानात
आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघ आज आर्मी कॅप घालून मैदानात उतरली. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून कॅप्टन कोहली ब्रिगेड आर्मी कॅपसह मैदानात उतरली.
रांचीच्या मैदानात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सर्व खेळाडूंना कॅप वाटल्या.
#IndvsAus – ऑस्टेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात आर्मी कॅप घालून टीम इंडिया मैदानात, रांचीच्या मैदानात धोनीने सर्व खेळाडूंना कॅप वाटल्या pic.twitter.com/jODcfxa65p
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2019
दरम्यान, या सामन्यात भारताने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. पहिले दोन सामने जिंकलेल्या टीम इंडियाचा आज विजयी आघाडी घेण्याचा निर्धार असेल. या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-2 अशी पिछाडीवर आहे.
भारताने नागपूरमधील दुसऱ्या थरारक सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला होता. तर पहिल्या वन डेत 6 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियावर मात केली.
वाचा – विराट कर्णधार, मग धोनीने सर्वांना आर्मी कॅप का वाटल्या?
भारत :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
ऑस्ट्रेलिया :
अॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शार्ट, शॉन मार्श, मार्कस स्टॉईनिस, उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी, पीटर हँड्सकोंब, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, जेसन बेहरेनडोर्फ, झाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, एंड्रयू टाय, नाथन कोल्टर नाईल आणि नाथन लायन
संबंधित बातम्या
भारताचा ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी विजय, विजय शंकरची अष्टपैलू कामगिरी