सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले आहे. प्रत्युतरात दाखल टीम इंडियाने चौथ्या दिवसखेर 2 विकेट गमावून 98 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 9 तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर नाबाद होते. टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 309 धावा कराव्या लागणार आहेत. (australia vs india 2020 21 3rd test day 4 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground) लाईव्ह स्कोअरकार्ड
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात झाली. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात दिली. या दोघांनी 71 धावांची भागीदारी केली. शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. गिल 31 धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला.
रोहितने पुजारासह स्कोअर कार्ड हलता ठेवला. यादरम्यान रोहितने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकानंतर रोहित आऊट झाला. रोहितने 98 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्ससह 52 धावांची खेळी केली.
रोहितनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. या दोघांनी दिवसखेर सावध खेळी केली. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 98 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 309 धावांची आवश्यकता असणार आहे.
त्याआधी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डाव 312-6 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला विजयासाठी 407 धावांचे आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने 81 धावा केल्या. तसेच मार्नस लाबुशेनने 73 धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून नवदीप सैनी आणि आर अश्विनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
LIVE NEWS & UPDATES
चौथ्या दिवसचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले आहे. प्रत्युतरात दाखल टीम इंडियाने चौथ्या दिवसखेर 2 विकेट गमावून 98 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 9 तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर नाबाद होते. टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 309 धावा कराव्या लागणार आहेत.
भारताला दुसरा धक्का लागला आहे. अर्धशतकी खेळीनंतर रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहितने 98 चेंडूत 52 धावांची खेळी केली.
रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावलं आहे.
चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. शुबमन गिल 31 धावांवर आऊट झाला आहे.
DRI मुंबईच्या अधिकाऱ्यांनी पकडला दुबईवरुन तस्करी करुन आणली जाणारी सिगारेट, मिळाल्या महितीच्या आधारावर केली दुबईवरुन आयात केलेल्या कंटेनरची चौकशी, 7 जानेवारी रोजी आलेल्या महिलेच्या फुटवेअरमध्ये गुडमगरम सिगारेट, जवळपास 18 ,00,000 स्टीक मिळाल्या , कंटेनर मध्ये लपवून आणला होता, महिलांच्या शूजकवर मध्ये लपवून आणला जात असल्याचा उघड, जप्त केलेल्या सिगारेटची किम्मत आहे जवळपास 3.24 कोटी रुपये, हा कंसाईएन्ट एका व्यक्तीच्या नावावर करण्यात आला होत आयात
रोहित शर्मा-शुबमन गिल या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली आहे. या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले आहे. या विजयी आव्हानाचे पाठलाग करायला टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात सलामीला आली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने 312 धावांवर त्यांचा डाव घोषित केला आहे. त्यामुळे कांगारुंनी आता भारतासमोर आता 407 धावांचं लक्ष्य उभं केलं आहे. दरम्यान, चहापानाच्या ब्रेकनंतर कांगारुंच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय सलामीवीर मैदानात उतरले आहेत.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. स्टिव्ह स्मिथ 81 धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात आलेला कर्णधार टीम पेन आणि कॅमरॉन ग्रीन हे दोघे 5.5 रनरेटने धावा फटकावल्या. 115 चेंडूत ग्रीन-पेनच्या जोडीने 104 धावांची भागिदारी रचली. जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडली. ग्रीनने जलद गतीने धावा जमवत शतकाकडे वाटचाल सुरु केली होती. परंतु जसप्रीत बुमराहने त्याचा काटा काढला. बुमराहने यष्टीरक्षक वृद्धीमान साहाकरवी त्याला झेलबाद केलं.
नवोदित फलंदाज कॅमरॉन ग्रीनने आज उत्कृष्ट फलंदाजीचं दर्शन घडवलं. सावध खेळ करत अर्धशतक करणाऱ्या ग्रीनने जलद गतीने धावा जमवत शतकाकडे वाटचाल सुरु केली होती. परंतु जसप्रीत बुमराहने त्याचा काटा काढला. ग्रीनने 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 132 चेंडूत 84 धावा फटकावल्या.
कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेन ही जोडी आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्रात जलदगतीने धावा जमवत आहेत. दरम्यान, नवोदित फलंदाज कॅमरॉन ग्रीनने आज त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतलं पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने 117 चेंडूत 51 धावा फटकावल्या आहेत.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली आहे. स्टिव्ह स्मिथ 81 धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार टीम पेन आणि कॅमरॉन ग्रीन या दोघांनी 5 रनरेटने धावा जमवण्यास सुरुवात केली आहे. 67 चेंडूत ग्रीन-पेनच्या जोडीने 50 धावांची भागिदारी रचली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यावर चांगली पकड मिळवली आहे. कांगारुंच्या संघाने 5 गड्यांच्या बदल्यात धावफलकावर 252 धावा लावल्या असून 346 धावांची आघाडी मिळवली आहे. कॅमरॉन ग्रीन 38 आणि कर्णधार टीम 29 पेन धावांवर खेळत आहेत.
तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 206 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे कांगारुंना या सामन्यात 300 धावांची आघाडी मिळाली आहे. स्मिथ 80 तर ग्रीन 22 धावांवर खेळत आहे.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि खेळपट्टीवर जम बसवलेल्या कॅमेरॉन ग्रीन या दोघांनी 50 धावांची भागिदारी रचली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 199 धावा फलकावर लावल्या आहेत. स्मिथ 74 तर ग्रीन 21 धावांवर खेळत आहे.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली आहे. 65 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोहम्मद सिराजचा स्मिथने चांगलाच समाचार घेतला. या षटकात त्याने सिराजला सलग षटकार आणि चौकार लगावत या सत्रात जलदगतीने धावा फटकावणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या अश्विनवरही प्रहार सुरु केला.
दुपारच्या जेवणाची सुट्टी (लंच ब्रेक) होईपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यावरील त्यांची पकड अधिकच मजबूत केली आहे. सकाळच्या सत्रात काल नाबाद राहिलेल्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी अतापर्यंत अर्धशतकं झळकावून सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकवला आहे. सकाळच्या सत्रात लाबूशेन आणि मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या कॅमेरुन ग्रीनने खेळपट्टीवर चांगलाच जम बसवला असून तो स्मिथला चांगली साथ देत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात त्यांनी 4 विकेट्सच्या बदल्यात 182 धावा फलकावर लावल्या आहेत. त्यामुळे कांगारुंना 276 धावांची आघाडी मिळाली आहे. स्टिव्ह स्मिथ 58 तर ग्रीन 20 धावांवर खेळत आहेत.
सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या स्टिव्ह स्मिथने तिसऱ्या कसोटीत त्याचा जलवा दाखवला आहे. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या स्मिथने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 54 व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत स्मिथने अर्धशतक पूर्ण केलं. 5 चौकारांच्या सहाय्याने 134 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं.