ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 274 धावा केल्या आहेत. खेळ संपला तेव्हा कॅमरॉन ग्रीन 28 तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलिाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कांगारुंनी पहिल्या 2 विकेट्स झटपट गमावल्या. फलंदाजीसाठी आलेल्या कांगारुंना मोहम्मद सिराजने पहिल्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. सिराजने डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्माच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट केलं. यानंतर शार्दूल ठाकूरने मार्कस हॅरिसला 5 धावांवर आऊट केलं.
यानंतर मार्नल लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडायला वॉशिंग्टन सुंदरला यश आले. सुंदरने स्टीव्ह स्मिथला 36 धावांवर रोहित शर्माच्या हाती कॅच आऊट केलं.
स्मिथ बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 87-3 अशी अवस्था झाली. मात्र यानंतर लाबुशेन आणि मॅथ्यू वेडने चौथ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. या दरम्यान मार्नस लाबुशेनने शतक झळकावलं. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. लाबुशेन आणि मॅथ्यू वेडने चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. यानंतर ही जोडी नटराजनला तोडायला यश आले. नटराजनने मॅथ्यू वेडला 45 धावांवर बाद केलं. वेड बाद झाल्यानंतर कॅमरॉन ग्रीन मैदानात आला.
मार्नस लाबुशेन शतकी खेळीनंतर बाद झाला. नटराजनने लाबुशेनला 108 धावांवर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं. लाबुशेनने 204 चेंडूत 9 चौकारांसह 108 धावा केल्या.
लाबुशेन बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 200 अशी झाली. त्यानंतर कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेनने डाव सावरला. या दोघांनी दिवसखेर नाबाद 61 धावांची भागीदारी केली आहे. टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या नटराजनने 2 विकेट्स घेतल्याय. तर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 फलंदाजाला बाद केलं.
पहिल्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या : 274-5 (87 Overs)
कॅमरॉन ग्रीन-28धावा* , टीम पेन – 38 धावा*
पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 274 धावा केल्या आहेत. कॅमरॉन ग्रीन 28 तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने 108 धावांची शतकी खेळी केली. तसेच मॅथ्यू वेडने 45 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाहेरचा रस्ता दाखवला. स्मिथने 36 धावा केल्या. टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या नटराजनने 2 विकेट्स घेतल्याय. तर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 फलंदाजाला बाद केलं.
कॅमरॉन ग्रीन आणि टीम पेन या जोडीने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला आहे. थंगारासू नटराजनने शतकवीर मार्नल लाबुशेनला आऊट केलं आहे. लाबुशेनने 204 चेंडूत 9 चौकारांसह 108 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला आहे. पदार्पण केलेल्या थंगारासू नटराजनने कसोटीतील पहिली विकेट घेतली आहे. नटराजनने मॅथ्यू वेडला 45 धावांवर शार्दूल ठाकूरच्या हाती कॅच आऊट केलं आहे.
मार्नल लाबुशेनने शानदार शतकी कामगिरी केली आहे. लाबुशेनच्या या शतकामुळे ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत पोहचली आहे.
मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे.
मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला स्थिरता दिली आहे. ऑस्ट्रेलियाने 87 धावांवर 3 विकेट्स गमावले होते. तिथपासून या जोडीने डाव सावरला आहे. ही जोडी शतकी भागीदारीच्या जवळ पोहचली आहे. तसेच मार्नस लाबुशेनही शतकापासून काही धावा दूर आहे.
स्टीव्ह स्मिथच्या विकोटनंतर मार्नस लाबूशेन आणि मॅथ्यू वेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. दोघांनी 50 धावांची भागिदारी केली आहे. तसेच अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लाबूशेनने भारतीय गोलंदाजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शार्दुल ठाकुरच्या नवव्या षटक्यात लाबूशेनने लागोपाठ दोन चौकार ठोकले. दरम्यान ऑस्ट्रेलियाने 150 धावांचा टप्पा पार केला असून लाबूशेन 70 तर वेड 27 धावांवर खेळतोय.
भरवशाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर मार्नस लाबूशेन आणि मॅथ्यू वेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. दोघांनी 50 धावांची भागिदारी केली असून लाबूशेन 56 तर वेड 27 धावांवर खेळतोय. या भागिदारीमुळे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 3 गड्यांच्या बदल्यात 137 धावा फलकावर लावल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ बॅटफुटवर असताना सावध खेळ करत भरवशाचा फलंदाज मार्नस लाबूशेनने अर्धशतक झळकावलं आहे. लाबूशेनने 145 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 50 धावा जमवल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 44 षटकांमध्ये 3 गड्यांच्या बदल्यात 110 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी कसलेली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवले आहे.
भरवशाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर मार्नस लाबूशेन आणि मॅथ्यू वेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. सावध खेळ करत त्यांनी धावफलक हलता ठेवला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. लाबूशेन 43 तर वेड 5 धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाने तिसरी विकेट गमावली आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर आक्रमक आणि अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ बाद झाला आहे. रोहित शर्माने त्याचे सुरेख झेल टिपला. सुंदरने त्याच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात स्टिव्ह स्मिथच्या विकेटच्या रुपाने केली आहे.
सुरुवातीला बॅटफुटवर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन या दोघांनी सावरला आहे. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली आहे. 28 षटकात ऑस्ट्रेलियाने 2 बाद 69 धावांपर्यत मजल मारली आहे. स्मिथ 30 तर लाबूशेन 23 धावांवर फलंदाजी करत आहेत.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. लंच ब्रेकपर्यंत दोघांनी सावध खेळ करत विकेट वाचवून ठेवली. 27 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने धावफलकावर 65 धावा लावल्या आहेत. स्मिथ 30 तर लाबूशेन 19 धावांवर फलंदाजी करत आहे.
दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. लाबूशेनने बचावात्मक तर स्मिथने आक्रमकपणे खेळाला सुरुवात केली आहे. दोघांमध्ये आता चांगली भागिदारी होताना दिसत आहे. 20 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने धावफलकावर 57 धावा लावल्या आहेत.
सामन्याच्या पहिल्या षटकात मोहम्मद सिराजने एका सलामीवीराला बाद केल्यानंतर वैयक्तिक पहिल्या षटकात (सामन्यातील नववं षट) शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलियाचा दुसरा मॉर्कस हॅरिसची शिकार केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ बॅटफुटवर ढकलला गेला आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ नव्या जलगदगती गोलंदांजांसह खेळत आहे. या सामन्यात एकही अनुभवी जलदगती गोलंदाज नाही. तरीदेखील नवख्या भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात कसलेली गोलंदाजी करुन ऑस्ट्रेलियाला हैराण केलं आहे. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्माकरवी झेलबाद करुन कांगारुंना बॅटफुटवर ढकललं आहे. तर टी नटराजननेही 6 षटकात केवळ 8 धावा दिल्या आहेत.