मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतील (Australia vs Team India 2nd Test) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) शानदार शतक लगावलं. रहाणेच्या कसोटी कारकिर्दीतील हे 12 शतकं ठरलं. एकूण 11 चौकारांच्या साहाय्याने अजिंक्यने हे शतक पूर्ण केलं. तसेच ऑस्ट्रेलियाविरोधात आणि मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील (MCG) हे दुसरं शतक ठरलं. या शतकासह रहाणेने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. (australia vs india 2nd test Ajinkya Rahane break record with century)
What a moment.
Ajinkya Rahane, take a bow! A Test century of the highest order.
?Watch Day 2 #AUSvIND Test on Fox Cricket or Kayo: https://t.co/Bp1efaz5MO
?Live blog: https://t.co/escskuGMiv
?Match Centre: https://t.co/hSscBuONMn pic.twitter.com/IYzvnsOQL2
— Fox Cricket (@FoxCricket) December 27, 2020
अजिंक्य रहाणेचं ऑस्ट्रेलियाविरोधातील हे दुसरं शतक ठरले आहे. विशेष म्हणजे अजिंक्यने ही दोन्ही शतकं बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Cricket Test) सामन्यात झळकावली आहेत. रहाणेने 2014 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शतक लगावलं होतं. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाकडून दोन शतक शतक लगावणारा अजिंक्य एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी टीम इंडियाकडून बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरोधात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने शतक लगावलं आहे.
Centuries for India in Boxing Day Test vs AUS
Sachin (1999)
Sehwag (2003)
Kohli (2014)
Rahane (2014)
Pujara (2018)
Rahane (2020)*#INDvsAUS— CricBeat (@Cric_beat) December 27, 2020
रहाणेचं ऑस्ट्रेलियाविरोधातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडलवरील दुसरं शतक ठरलं आहे. अजिंक्य मेलबर्नवर दुसऱ्यांदा शतक लगावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी टीम इंडियाकडून विनो मांकड यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात मेलबर्नवर 2 शतक लगावले होते. तसेच सुनील गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या फलंदाजांनी मेलबर्नवर कांगारुंविरुद्ध प्रत्येकी 1 वेळेश शतक लगावलं आहे.
Indians with Most Test Centuries at MCG
2 – Rahane*
2 – V Mankad
1 – Gavaskar
1 – Kohli
1 – Pujara
1 – Sehwag
1 – Sachin
1 – Vishwanath#AUSvIND— ComeOn Cricket ??? (@ComeOnCricket) December 27, 2020
रहाणे ऑस्ट्रेलियाविरोधात शतकी कामगिरी करणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. याआधी टीम इंडियाकडून कांगारुंविरुद्ध कर्णधार म्हणून अझर, सचिन तेंडुलकर,सौरव गांगुली आणि विराट कोहली या कर्णधारांनी ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक लगावण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने एकूण 4 वेळा शतक लगावलं आहे.
Indian Captains To Score Test Century in AUS
Azhar (1992)
Sachin (1999)
Ganguly (2003)
Kohli (2014)
Kohli (2014)
Kohli (2015)
Kohli (2018)
Rahane (2020)*#INDvsAUS— CricBeat (@Cric_beat) December 27, 2020
संबंधित बातम्या :
Australia vs India, 2nd Test | विकेटकीपर टीम पेनचा शानदार एकहाती कॅच, चेतेश्वर पुजारा तंबूत
(australia vs india 2nd test Ajinkya Rahane break record with century)