सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसऱ्या सामन्यातील (Aus vs IND 3rd Test) दुसरा दिवसाचा खेळ खेळला जात आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना पहिल्या डावात 338 धावांवर गुंडाळले. कांगारुंनी टीम इंडियावर पहिल्या दिवसात आक्रमकपणे खेळ केला. मात्र टीम इंडियाने दुसऱ्या दिवसात चहापानाआधी ऑल आऊट केलं. फिरकीपटू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), पदार्पणातील नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कांगारुंना दुसऱ्या दिवशी दणका दिला. (Australia vs India 3rd Test ravindra jadeja navdeep saini and jasprit bumrah super bowling performence)
जाडेजाचा चौकार
A bullet throw ☄️from @imjadeja gets the centurion Steve Smith OUT??
That will be the end of the Australian innings ??
Jadeja, pick of the bowlers with 4️⃣ wickets in his bag?#TeamIndia #AUSvIND
Scorecard ? https://t.co/tqS209srjN pic.twitter.com/Iu45T2fp8c
— BCCI (@BCCI) January 8, 2021
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. ऑस्ट्रेलियाची 2 बाद 166 धावसंख्या होती. स्टीव्ह स्मिथ 31* तर मार्नस लाबुशेनन 67* धावांवर नाबाद होते. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 100 धावा जोडल्या. लाबुशेन आणि स्मिथ जोडी मैदानात सेट झाली होती. ही जोडी डोकेदुखी ठरत होती. ही जोडी जाडेजाने फोडली. जाडेजाने लाबुशेन बाद केलं. लाबुशेन 91 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 11 चौकार खेचले.
जाडेजाने टीम इंडियाला दुसऱ्या दिवसातील पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने धक्के द्यायला सुरुवात केली.
कांगारुंनी मॅथ्यू वेडच्या रुपात चौथी विकेट गमावली. जाडेजाने वेडला मैदानात सेट होऊ दिले नाही. जाडेजाने वेडला 13 धावांवर बुमराहच्या हाती कॅच आऊट केलं. कॅमरॉन ग्रीनने 21 चेंडूंचा सामना केला. मात्र त्याला भोपळाही फोडता आला नाही. बुमराहने ग्रीनला शून्यावर एलबीडल्यू आऊट केलं.
कर्णधार टीम पेनला या सामन्यात विशेष काही करता आले नाही. पेनला बुमराहने 1 धावेवर बोल्ड केलं. एका बाजूला विकेट जात होते. पण स्टीव्ह स्मिथ मैदानात पाय रोवून उभा होता. स्मिथने पॅट कमिन्ससह काही ओव्हर धावफळक हलता ठेवला. या दरम्यान त्याने टीम इंडियाविरोधातील 8 वं तर कसोटी कारकिर्दीतील एकूण 27 वं शतक झळकावलं.
There it is ?
Steve Smith makes a vital ? at the SCG! #AUSvIND pic.twitter.com/x06NbcZcba
— 7Cricket (@7Cricket) January 8, 2021
कमिन्सने 12 चेंडूमध्ये एकही धाव केली नाही. पुढील म्हणजेच 13 व्या चेंडूवर जाडेजाने कमिन्सला बोल्ड केलं. यानंतर सैनीने स्टार्कला 24 धावावंर शुभमन गिलच्या हाती कॅच आऊट केलं. जाडेजाने कांगारुंना नववा धक्का दिला. नॅथन लायनला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं.
स्मिथ चौथ्या क्रमांकावर खेळायला आला. त्यानंतर त्याच्या सर्व सहकाऱ्यानंनी आपली विकेट गमावली. मात्र स्मिथने भारतीय गोलंदाजांचा सामना केला. ऑस्ट्रेलियालचा डाव सावरला. एका बाजूला विकेट जात होते. पण स्टीव्ह डगमगला नाही. तो अखेरपर्यंत खेळत राहिला. मात्र रवींद्र जाडेजाच्या रॉकेट थ्रोवर स्मिथ रन आऊट झाला. स्मिथने 226 चेंडूत 16 चौकारांसह 131 धावा केल्या.
जाडेजाचा रॉकेट थ्रो
Ravindra Jadeja You're amazing. What an incredible Run out. Steve Smith out with a Outstanding Throw run out by Jadeja. #AUSvINDtest #AUSvIND #AUSvsINDpic.twitter.com/CzDCjUz1bl
— ?Cricket Videos? (@cricket_videos_) January 8, 2021
संबंधित बातम्या :
Australia vs India, 3rd Test, 2nd Day Live : शुभमन गिल-रोहित शर्मा जोडीची सलामी अर्धशतकी भागीदारी
(Australia vs India 3rd Test ravindra jadeja navdeep saini and jasprit bumrah super bowling performence)