मुंबई : कसोटी सामना (Test Cricket) हा 5 दिवस खेळण्यात येतो. यामध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी संघ प्रत्येकी 2 वेळा बॅटिंग आणि बोलिंग करतात. टी 20 क्रिकेटच्या आगमनानंतर साधारणपणे टेस्ट मॅच 3 ते 4 दिवसात संपते. पण कसोटी सामना अवघ्या 5 तासात संपल्याचं कधी ऐकलं आहे का? कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपासून काही वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. तो कसोटी सामना अवघ्या तासात उरकला होता. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. (australia vs south africa australia Spinner bert ironmonger take 11 wickets in one match in 1932)
या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South AFrica) आमनेसामने होते. 12-15 जानेवारी 1932 दरम्यान या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अफ्रिकेचा कर्णधार जॉक कॅमरुनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पण यानंतर जे घडलं त्याची पुसटशी ही कल्पना आफ्रिकेला नव्हती.
आफ्रिकेचे फलंदाज बॅटिंगसाठी मैदानात आले. यानंतर आफ्रिकने एकामागोमाग एक विकेट टाकली. आफ्रिकेचा पहिला डाव पत्त्यासारखा कोसळला. आफ्रिका पहिल्या डावात अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाली. अफ्रिकेच्या 10 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नााही. 3 खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन जॉक कॅमरुनने सर्वाधिक 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू बर्ट आयरनमोंगरने (Bert Ironmonger) अवघ्या 6 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लॉरी नॅशने 4 विकेट्स घेतल्या.
आफ्रिकेचा डाव गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंगसाठी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 153 धावा केल्या. कांगारुंकडून अॅलन किप्पाक्सने 42 तर जॅक फिंगलटनने 40 धावा केल्या.
दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धाराने मैदानात आली. पण या डावातही आफ्रिकेचा भ्रमनिरास झाला. अफ्रिकेने दुसऱ्या डावात पहिल्या डावाच्या तुलनेत केवळ 9 धावा जास्त केल्या. म्हणजेच आफ्रिकेला सेकंड इनिंगमध्ये केवळ 45 धावाच करता आल्या. 5 बॅट्समन शून्यावर आऊट झाले. तर कुर्नोने सर्वाधिक 16 धावा केल्या. या दुसऱ्या डावातही आयरनमोंगरने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या. त्याने 15.3 ओव्हर टाकल्या. यापैकी 7 मेडन ओव्हर टाकल्या. तर 18 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे आयरनमोंगरने दोन्ही डावात मिळून अवघ्या 24 धावांच्या मोबदल्यात 11 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
सांगण्यासाठी हा सामना एकूण 4 दिवस चालला. पण या सामन्यातील पहिल्याच दिवशी काही ओव्हर्सचा खेळ झाला. त्यानंतरचे उर्वरित दिवस पावासाच्या व्यत्यायामुळे वाया गेले. यामुळे हा सामना एकूण 5 तास 53 मिनिटंच चालला.
संबंधित बातम्या :
Video | “थोडासा आगे मिल्खा सिंग भागे”, विकेटकीपर पंतची स्टंपमागून विनोदी कॉमेंट्री
(australia vs south africa australia Spinner bert ironmonger take 11 wickets in one match in 1932)