मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलियातील एक दिवसीय मालिकेला 12 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी खास तयारी केली आहे. एकदिवसीय मालिकेत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ 33 वर्ष जुनी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. अॅलन बॉर्डर हे 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते, त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ गडद पिवळ्या सोनेरी रंगाच्या जर्सीवर हिरवा पट्टा अशी जर्सी घालत होता. त्याच जर्सीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
1986 मध्ये वापरण्यात आलेली जर्सी पुन्हा 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ घालणार असल्याने, सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आठ वर्षांनी वेगवान गोलंदाज पीटर सीडलचा या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. तब्बल आठ वर्षांनी पीटर सीडल एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करत आहे. सीडलने नोव्हेंबर 2010 मध्ये आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
Australia are going retro. For the ODIs against India, they’re bringing back the green and gold from the ’80s#AUSvIND #ThrowbackThursday pic.twitter.com/08kkZuvTFI
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 10, 2019
बिग बॅश लीगमध्ये पीटर सीडलने उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याला 8 वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळालं. पुन्हा एकदिवसीय सामन्यात खेळणार असल्याने सीडल आनंदी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 12 जानेवारीला सिडनीमध्ये, दुसरा सामना 15 जानेवारीला अॅडलेड आणि तीसरा सामना 18 जानेवारीला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरची कमी भासत आहे. तर येत्या विश्वकप सामन्याआधी दोन्ही खेळाडूंचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
एक दिवसीय मालिकेती भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ
ऑस्ट्रेलिया संघ : कर्णधार अॅरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटल हँड्सकोंब, ग्लेन मॅक्सवेल, अॅश्टन टर्नल, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स कारे, मिचेल मार्श, जे. रिचर्डसन, बिली स्टेनलेक, जेसन बेहरेनडोर्फ, पीटर सीडल, नॅथन लायन आणि अॅडम झाम्पा.
भारतीय संघ : कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम. एस. धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा : आता ऑस्ट्रेलिया भारतात येणार, मालिकेचं वेळापत्रक जाहीर