मुंबई – ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात (Car Accident) शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे. अँड्र्यू सायमंड्स याचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे.अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये परिसरात अपघात झाला आहे. झालेला भीषण अपघातामध्ये सायमंड्स निधन झालं आहे. जखमी झालेल्या ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी वाचवण्याचा पुर्णपणे प्रयत्न देखील केला आहे. अपघात झाल्यानंतर अँड्र्यूला जवळच्या रूग्णालयात ज्यावेळी दाखल केले त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर संपुर्ण क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
Tragic news surrounding the former Australia all-rounder and our thoughts are with his friends and family.https://t.co/6eXiz8Mb5O
हे सुद्धा वाचा— ICC (@ICC) May 14, 2022
रस्त्यात कार उलटली
रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी एलिस नदी पुलाजवळ हर्वे रेंज रोडवर कार निघाली होती. त्यावेळी कार रस्त्यावर उलटली आणि अपघात झाला. घटनास्थळी एका इसमाला वाचवताना हा अपघात झाला आहे. चालक मात्र जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक क्रॅश युनिट तपास करत आहे. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. सायमंड्सच्या कुटुंबाने सुध्दा निधन झाल्याचे सांगितले आहे.
Aussie cricket legend Andrew Symonds dies in car crash
Read @ANI Story | https://t.co/1lww4sxXSL#Aussie #AndrewSymonds pic.twitter.com/o2khoOmONj
— ANI Digital (@ani_digital) May 15, 2022
एक जुन्या पद्धतीचा क्रिकेटपटू होता
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरने सायमंड्स यांना श्रद्धांजली वाहिली. नाईन नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले की, ‘त्याला बॉल लांब मारून चाहत्यांचे मनोरंजन करायला आवडायचे. तो एक जुन्या पद्धतीचा क्रिकेटपटू होता. अलिकडच्या काळात, सायमंड्सने फॉक्स स्पोर्ट्ससाठी टीव्ही समालोचक म्हणून काम केले. तसेच बिग बॅश लीगच्या प्रसारणासाठी मायक्रोफोनवर नियमितपणे काम केले आहे. सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 198 वनडे आणि 14 टी-20 सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटने अनुक्रमे 1462, 5088 आणि 337 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 165 विकेट घेतल्या आहेत. सायमंड्स त्याच्या आक्रमक आतून आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जात असे.
ऑस्ट्रेलियासाठी 198 दिवसीय सामने खेळले
ऑस्ट्रेलियासाठी 198 दिवसीय सामने खेळलेला सायमंड्स 2003 च्या विश्वचषक संघाचाही भाग होता. त्या दोन वर्षांत पाँटिंगच्या नेतृत्वाखाली कांगारू संघाने एकही सामना न गमावता जेतेपदे पटकावली होती.
याशिवाय या महान खेळाडूने ऑस्ट्रेलियाकडून 26 कसोटीही खेळल्या आहेत.