नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू मायकल क्लार्कने (Michael Clarke) त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघासाठी 2015 साली विश्वचषक जिंकला. लग्नाच्या सात वर्षानंतर त्याने 2019 मध्ये पत्नी काइलीशी ( wife Kylie) घटस्फोट (Divorced) घेतला होता. त्यांचा घटस्फोट का झाला होता. त्याबद्दल नुकतेच काही माध्यमांनी त्यांचे फोटो आणि माहिती छापली आहे. मायकेल क्लार्कने 2012 मध्ये कायलीशी लग्न केले होत. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या असिस्टंटसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याला कायलीशी घटस्फोट घ्यावा लागला होता. तोही त्यावेळी 300 कोटी रुपयांची फारकत घेऊन.
त्या दोघांनाही एक मुलगी असून तिचे नाव केल्सी असल्याचे सांगण्यात आले आहे.ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये 2018 मध्ये मायकेल क्लार्कचे त्याच्या असिस्टंटसोबत अफेअर असल्याची बातमी आली होती.
साशा मायकल ही क्लार्कच्या क्रिकेट अकादमीचे काम सांभाळत असली तरी कामानंतर मात्र ही दोघं एकत्रच वेळ घालवत होती.
त्यानंतर काही दिवसांनी मायकेल क्लार्क आणि साशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ते एका आलिशान यॉटमध्ये निवांत पहुडल्याचे दिसत होते.
त्यानंतर मात्र त्या फोटोची सोशल मीडिया बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी क्लार्कच्या वैवाहिक जीवनात मात्र वादळ निर्माण झाले होते. त्यावेळी क्लार्कने मात्र त्यांच्या या नातेसंबंधाबद्दल कुठेही काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
मायकेल क्लार्कने जेव्हा घटस्फोटाची घेतला होता, त्यावेळी त्याला 40 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 300 कोटी मोजावे लागले होते.
मीडियाशी बोलताना मायकेल क्लार्क म्हणाला होता की, काही काळ वेगळे असतानाही आम्ही हा आमच्यासाठी असणारा कठीण निर्णय घेतला होता. तरीही आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि आम्ही ठरवले आहे की वेगळे होण्यात आम्हा दोघांच्या हिताचे आहे.