आर. अश्विनमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नाथन लायन आणि पत्नीचं बिनसलं? नेमकं असं काय झालं

| Updated on: Feb 16, 2023 | 8:35 PM

आर. अश्विन हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नाथन लायनच्या घरात वादाचं कारण ठरला होता. व्हिडीओ पाहताना लायनचं कशातच मन रमत नसल्याने त्याची पत्नी नाराज झाली होती. इतकंच काय तर कडाक्याचं भांडणही झालं होतं.

आर. अश्विनमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नाथन लायन आणि पत्नीचं बिनसलं? नेमकं असं काय झालं
क्रिकेटपटू नाथन लायन आणि पत्नीत आर. अश्विनमुळे वाद! नेमकं कारण वाचा
Follow us on

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे.पहिला कसोटी सामना फिरकीपटूंनी गाजवला. रविंद्र जडेजा, आर. अश्विन फिरकीपटूंनी खेळपट्टीवर कमाल केली.या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने चांगली तयारी केली होती. बऱ्याच वर्षानंतर दोन फिरकीपटू घेऊन ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला होता. यामध्ये टोड मर्फी आणि नाथन लायन या दोघांचा समावेश होता. टोड मर्फीने 7 गडी बाद केले. तर नाथन लायनला एका गड्यावर समाधान मानावं लागलं. या मालिकेसाठी नाथन लायननं चांगली तयारी केली होती. यासाठी त्याने आर. अश्विनचे अनेक व्हिडीओ पाहिले होते आणि यामुळे पत्नी त्याच्यात वाद झाला होता. लायन प्रत्येक ठिकाणी अश्विनचे व्हिडीओ पाहात होता. तसेच त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे पत्नीने त्याच्यावर रागही व्यक्त केला होता.

ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा भारतात दाखल झाला तेव्हा अश्विन सारखी गोलंदाजी करणाऱ्या महिश पीथियाकडून सराव केला. मात्र याचा काही एक फायदा झाला नाही.नागपूर टेस्टमध्ये अश्विनने कमाल करून दाखवली.अश्विनने पहिल्या डावात 15.5 षटकं टाकत 42 धावा देत 3 गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 12 षटकात 37 धावा देत पाच गडी बाद केले.

लायनने स्टार स्पोर्टसची बोलताना सांगितलं की, भारतात येण्यापूर्वी मी अश्विनच्या गोलंदाजीचा अभ्यास करत होतो. मी अश्विनशी स्पर्धा करू शकत नाही. अश्विनची गोलंदाजी जबरदस्त आहे. त्याचे विक्रमच याबाबत सर्वकाही सांगतात. मी अश्विनपेक्षा खूपच वेगळा गोलंदाज आहे.पण असलं तरी मी त्याचे व्हिडीओ पाहात होतो.वारंवार व्हिडीओ पाहात असल्याने पत्नी नाराज झाली होती.

नाथन लायनची पहिल्या कसोटीतील कामगिरी

पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात नाथन लायन 0 या धावसंख्येवर नाबाद राहिला. त्यानंतर गोलंदाजीत 49 षटकात 126 धावा देत 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला येत 8 धावा करून तंबूत परतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.

बॉर्डर गावसकर कसोटी स्पर्धा

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा कसोटी सामना) – दिल्ली, भारत, 17-21 फेब्रुवारी
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – धर्मशाला, भारत, 1-5 मार्च
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.