पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत थरारक निकाल पाहायला मिळत (Maharashtra Kesari kusti competition) आहेत. गतवर्षीचा विजेता महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके या दोघांचाही थरारक पराभव झाला. हे दोघेही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतूनच बाहेर पडले आहेत. त्यामुळे यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार (Maharashtra Kesari kusti competition) हे निश्चित झालं आहे.
पुण्यातील बालेवाडी येथे 63 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील आजच्या थरारक निकालाने रंगत आणली. आज माती विभागात गतविजेता बाला रफिक शेख विरुद्ध सोलापूरचा ज्ञानेश्वर उर्फ माऊल जमदाडे यांच्यात लढत झाली. माऊली जमदाडेने अत्यंत चपळाईने डाव टाकत, बाला रफिक शेखल चितपट केलं. गतवर्षीच्या विजेत्याला चितपट केल्याने, माऊली समर्थकांनी एकच जल्लोष केला.
हर्षल सदगीरची अभिजीत कटकेवर मात
दुसरीकडे गतवर्षीचा उपविजेता अभिजीत कटकेचा मॅट विभागात पराभव झाला. नाशिकच्या हर्षल सदगीरने अभिजीतचा 5-2 असा पराभव करुन, थेट फायनलमध्ये धडक दिली.
माऊली जमदाडेचाही पराभव
बाला रफीकचा हरवणाऱ्या माऊली जमदाडेलाही आपला विजय फार काळ टिकवता आला नाही. पुढच्याच फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेने माऊलीचा परभाव करत, फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे आता महाराष्ट्र किताबासाठी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळके यांच्यात उद्या म्हणजे मंगळवारी अंतिम लढत होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन्हीही मल्ल काका पवार यांच्या तालमीतील आहेत.