कॅनबेरा : स्थानिक टेनिस क्रिकेट स्पर्धांपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम असतो. पण अंपायरने (Umpire) दिलेला निर्णय नेहमी अचूक असतोच असं नाही. पंचाने चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने मिचेल मार्शचा (Mitchell Marsh) पारा चढला. मार्शने भर मैदानातच अंपायरला शिव्या घातल्या. या शिव्या घालणं मार्शला चांगलंच महागात पडलं आहे. मार्शवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दंडात्मक कारवाई केली आहे. (bbl 2020 mitchell marsh was fined 2 lakh 79 for insulting the umpire during the match)
मार्शने अंपायरला शिव्या दिल्याने त्याच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं. मार्शकडून आचार संहितेच्या लेव्हल 1 चं उल्लंघन झालं. यामुळे मार्शला तब्बल 5000 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 2 लाख 79 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मार्शने ही दंडात्मक रक्कम भरण्याचे मान्य केले. तसेच सुदैवाने त्याच्यावर निलंबनात्मक कारवाई करण्यात आली नाही. जर असे झाले असते तर त्याला पुढील काही सामन्यांना मुकावे लागले असते.
शनिवारी 30 जानेवारीला पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) यांच्यात सामना खेळण्यात आला. पर्थचा संघ फलंदाजी करत होता. ऑलराऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) बॅटिंग करत होता. स्पीनर स्टीव ओ कीफ सामन्यातील 13 वी ओव्हर टाकत होता.
Village.
?♂️?♂️ ?♂️?♂️ pic.twitter.com/BM113lceYj
— Cricket on BT Sport (@btsportcricket) January 30, 2021
या ओव्हरमधील 5 व्या चेंडू लेग स्टंपच्या दिशेने गेला. मार्शने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. बॅटला चेंडूचा स्पर्शही झाला नाही. हा चेंडू विकेटकीपरने अचूक झेलला. यावर कॅचसाठी अंपायरकडे जोरदार अपिल करण्यात आली. अंपायरने मार्शला तडक बाद घोषित केलं. अंपायरने मार्शला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केलं. यामुळे मार्शला राग अनावर झाला. मार्शने आपला संताप व्यक्त केला. बाद दिल्याने मार्श ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. यावेळेस त्याने भर मैदानात अंपायरला शिवीगाळ केली.
संबंधित बातम्या :
(bbl 2020 mitchell marsh was fined 2 lakh 79 for insulting the umpire during the match)