मुंबई : दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्ये बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी सामन्यांचे संघ जाहीर केले आहेत. कसोटीच नाहीतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेच्या संघाचीही घोषणा केली आहे. यामध्ये वनडे संघाच्या उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागली आहे. इतकंच नाहीतर हार्दिक पांड्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात थेट कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.
रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार आहे मात्र पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या असणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे.
पांड्यालाही मोठी संधी असणार असून भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जातं आहे. त्यामुळेच बीसीसीआयने संघात इतर वरिष्ठ खेळाडू असतानाही पांड्याकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवली आहे. आगमी वर्ल्ड कपसाठी पर्यायी कर्णधार म्हणूनही त्याला निवडलं असावं. जर वर्ल्डकपमध्ये अशी स्थिती उद्भवली तर हार्दिक पांड्या ही धुरा सांभाळू शकतो.
उर्वरित दोन कसोटींसाठी जाहीर केलेल्या कसोटी संघामध्ये बीसीसीआयने केएल राहुल याच्या फ्लॉप कामगिरीनंतरही निवड समितीने केएल राहुल याच्यावर विश्वास दाखवत संधी दिली आहे. जयदेव उनाडकटलाही परत संघात स्थान देण्यात आलं असून वनडे संघातही त्याची निवड झाली आहे.
India’s ODI squad vs Australia
Rohit Sharma (C), S Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul, Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), R Jadeja, Kuldeep Yadav, W Sundar, Y Chahal, Mohd Shami, Mohd Siraj, Umran Malik, Shardul Thakur, Axar Patel, Jaydev Unadkat
— BCCI (@BCCI) February 19, 2023
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.