मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार आजपासून अनुभवता येणार आहे. 14 व्या हंगामाची सुरुवात आजपासून म्हणजेच 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर ही लढत खेळली जाणार आहे. (Bcci Announces Schedule For Ipl 2021)
? BCCI announces schedule for VIVO IPL 2021 ?
The season will kickstart on 9th April in Chennai and the final will take place on May 30th at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.
More details here – https://t.co/yKxJujGGcD #VIVOIPL pic.twitter.com/qfaKS6prAJ
— IndianPremierLeague (@IPL) March 7, 2021
या मोसमातील पहिला सामना हा गत विजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 56 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पार पडणार आहेत.
चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी 10-10 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8-8 सामने खेळवण्यात पार पडणार आहेत.
या पर्वात एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी 3. 30 वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
14 व्या पर्वातील प्ले ऑफचे सामने (बाद फेरी) हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तसेच अंतिम सामनाही याच मैदानात आयोजित करण्यात आला आहे. अंतिम सामना 30 मे ला पार पडणार आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 13 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
(Bcci Announces Schedule For Ipl 2021)