नवी दिल्ली : बीसीसीआयने (BCCI) नीतू डेव्हिडची (Neetu David) राष्ट्रीय महिला संघाच्या पाच सदस्यीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. नीतूची हेमलता कला यांच्या जागी निवड करण्यात आली आहे. नीतू डेविड व्यतिरिक्त निवड समितीच्या सदस्यांमध्ये वेंकटाचार कल्पना, आरती वैद्य, रेणू मार्गरेट आणि मिठू मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. या चारही भारतीय महिला संघाच्या माजी क्रिकेटपटू आहेत. हेमलता कालाच्या नेतृत्वाखालील निवड समितीची मुदत मार्च 2020 मध्येच संपली होती. ( Bcci new chief selector neetu david )
NEWS : The BCCI on Saturday announced the appointment of All-India Women's Selection Committee.
On account of seniority, Neetu David, the former left-arm spinner, will head the five-member committee.
More details – https://t.co/eBy5hkfkrH pic.twitter.com/Vr7OlGK9gO
— BCCI (@BCCI) September 26, 2020
नीतू डेविड वरिष्ठ असल्याने निवड समितीच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नीतूच्या नावावर आहे. 1995 मध्ये जमशेदपूर येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात नीतूने अवघ्या 53 धावा देत 8 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.
नीतू डेविडची क्रिकेट कारकिर्द
टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी नीतू ही पहिली भारतीय महिला बोलर आहे. नीतूने एकूण 97 वनडे मॅचमध्ये 141 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच नीतूने एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 41 विकेट घेतले आहेत. दोन वेळा एका डावात 5 विकेट घेण्याची कामगिरी तीने केली आहे. 20 धावा देत 5 विकेट ही तीची सर्वोत्कृष्ठ खेळी आहे.
? Neetu David
? Arati Vaidya
? Renu Margrate
? Venkatacher Kalpana
? Mithu MukherjeeIndia have appointed a five-member selection committee for the national women's side, led by Test bowling world record-holder David ?? pic.twitter.com/OVv509pWMx
— ICC (@ICC) September 26, 2020
तसेच आरती वैद्यने भारताकडून 3 कसोटी आणि 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. रेणू मार्गरेटने 5 टेस्ट आणि 23 वनडे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वैंकटाचेर कल्पनाला 3 टेस्ट आणि 8 वनडे मॅच खेळण्याचा अनुभव आहे. तर मीठू मुखर्जीने 4 कसोटी सामने खेळले आहेत.
दरम्यान हरमनप्रीत कौर संध्या भारतीय महिला टी 20 संघाचं नेतृत्व करत आहे. तर कसोटी आणि वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिताली राजकडे आहे. भारतीय महिला संघाने यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टी 20 स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. भारतीय संघाने उपविजेतेपद पटकावलं होतं.
संबंधित बातमी :
IPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम
IPL 2020 : CSK चे सलग दोन पराभव, सुरेश रैना परतणार का? संघ व्यवस्थापक म्हणतात….
( Bcci new chief selector neetu david )