इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार?

| Updated on: May 21, 2021 | 12:13 AM

आयपीएलमधील उर्वरित सामने लवकरात लवकर खेळवण्यासाठी बीसीसीआय उत्सूक आहे. हे सामने कधी खेळवता येतील, यासाठी बीसीसीआय चाचपणी करत आहे

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या या प्रस्तावाला ECB साद देणार?
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci President Sourav Ganguly)
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करावा लागला आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील उर्वरित सामने लवकरात लवकर खेळवण्यासाठी बीसीसीआय उत्सूक आहे. हे सामने कधी खेळवता येतील, यासाठी बीसीसीआय चाचपणी करत आहे. त्यासाठी बीसीसीआयकडून जोरदार प्रयत्नदेखील सुरु आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (England and Wales Cricket Board) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. अद्याप या बाबतीत इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून (ECB) कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. (BCCI asks England Cricket board to prepone IND vs ENG Tests schedule for IPL 2021 window)

ईएसपीएन क्रिकइन्फोने याबाबत एक अहवाल दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जर बीसीसीआयची ही विनंती स्वीकारली तर कदाचित या मालिकेनंतर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाऊ शकतील. सध्याच्या योजनेनुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून ट्रेंटब्रिजमध्ये सुरू होणार आहे. असं म्टटलं, जातंय की, आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात पूर्ण करण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. आयपीएल 2021 चे 31 सामने बाकी आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्याच्या योजनेनुसार पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये 4 ते 8 ऑगस्टदरम्यान ट्रेंटब्रिज, 12 ते 16 ऑगस्टदरम्यान लॉर्ड्स, 25 ते 29 ऑगस्टदरम्यान हेडिंग्ले, 2 ते 6 सप्टेंबरदरम्यान ओव्हल आणि 10 ते 14 सप्टेंबरला ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

तीन आठवड्यात IPL चे उर्वरित सामने?

बीसीसीआयने पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, प्रत्येक कसोटी सामना एक आठवडा लवकर खेळवण्यात यावा. सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयला असे वाटते की, कसोटी मालिका लवकर सुरू झाल्यामुळे आयपीएलचे 31 सामने पूर्ण करण्यास तीन आठवड्यांचा अवधी मिळेल. त्यांना खात्री आहे की, हे 31 सामने तीन आठवड्यांत पूर्ण करता येतील. यासाठी दररोज डबल हेडर सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच एका दिवसात दोन सामने खेळवले जातील. त्यानंतर सर्व संघ टी – 20 वर्ल्डकपची तयारी सुरू करतील. ऑक्टोबरच्या मध्यात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. त्यानंतर 14 नोव्हेंबरला ही स्पर्धा संपेल.

आयपीएलच्या यजमानपदासाठी हे देश उत्सुक

दरम्यान गांगुलीच्या वक्तव्यामुळे उर्वरित सामने भारतात होणार नाही, हे स्पष्ट झालंय. मात्र या उर्वरित 31 सामन्यांच्या यजमानपदासाठी एकूण 4 देश इच्छुक आहेत. यामध्ये इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि यूएईचा समावेश आहे. यूएईमध्ये 13 व्या मोसमाचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयची विनंती स्वीकारली तर कदाचित आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने इंग्लंडमध्येच खेळवले जाऊ शकतात.

…तर बीसीसीआयला आर्थिक फटका

कोरोनामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे बीसीसीआयला उर्वरित सामने खेळवता न आल्यास आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. बीसीसीआयला तब्बल 2 हजार 500 कोटींचा फटका सहन करावा लागेल.

संबंधित बातम्या

इंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण? VVS लक्ष्मणने सांगितलं नाव!

Rahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार?

17 वर्षांची असताना भारताविरोधात पदार्पण, धोनीसारखं शार्प डोकं, टॉपलेस फोटो टाकून उडवला धुराळा!

(BCCI asks England Cricket board to prepone IND vs ENG Tests schedule for IPL 2021 window)