अहमदाबाद : टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) . क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांपैकी एक. त्यांना क्रिकेट विश्वात ‘लिटील मास्टरही’ म्हटलं जातं. गावसकरांचा आज इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानामागचं कारणही तितकंच विशेष आहे. गावसकरांनी आजपासून 50 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गावसकरांनी केलेल्या कामगिरीसाठी तसेच त्यांच्या बहुमुल्य योगदानासाठी सन्मान करण्यात आला. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी गावसकरांना टीम इंडियाची कॅप देऊन त्यांना सन्मानित केलं. (bcci celebrating 50th anniversary of little master sunil gavaskar Test debut for)
Join me in celebrating the 50th anniversary of Shri Sunil Gavaskar Ji's Test debut for ??. It is indeed a momentous occasion for all Indians and we are getting to celebrate it at the world's largest cricket facility Narendra Modi Stadium ?️ @ICC @BCCI pic.twitter.com/NzolBqvKzI
— Jay Shah (@JayShah) March 6, 2021
गावसकरांनी 6 मार्च 1971 रोजी वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवण्यात आला होता. गावसकरांनी त्यांच्या या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी या सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यांनी या मालिकेत एकूण 774 धावा ठोकल्या होत्या. त्यांचा हा विक्रम अजूनही कायम आहे.
Celebrating 50 years of Sunil Gavaskar's Test debut ??
The cricketing world paid tribute to the legendary former India Captain Mr. Sunil Gavaskar on the occasion of his 50th anniversary of his Test debut for India. @Paytm #INDvENG
Full video ? ? https://t.co/k97YiyvcmR pic.twitter.com/za4Soq0yMh
— BCCI (@BCCI) March 6, 2021
गावसकर कसोटीमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे पहिलेच फलंदाज ठरले. त्यांच्यानंतर अनेक खेळाडूंनी ही कामगिरी केली.
दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या 29 कसोटी शतकांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची कामगिरी त्यांनी केली. असा किर्तीमान करणारे ते पहिलेच फलंदाज ठरले.
गावसकरांनी 2 कसोटी मालिकांमध्ये प्रत्येकी 700 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली. अशी खेळी करणारे ते पहिलेत भारतीय ठरले. तसेच गावसकरांनी कसोटीत सामन्यातील दोन्ही डावात तीनवेळा शतक लगावले आहे. अशी खेळी करणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले.
कसोटी सामन्यात एकूण 4 डाव असतात. गावसकरांनी वेगवेगळ्या सामन्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या डावात फलंदाजी करताना द्विशत झळकावलं आहे. असा किर्तीमान करणारे ते एकमेव आहेत. आतापर्यंत अशी कामागिरी कोणत्याच फलंदाजाला करता आलेली नाही.
माजी कर्णधार कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 1983 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप मिळवून दिला. गावसकर या वर्ल्ड कप विजयी संघाचे सदस्य होते. गावसकरांच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण होता.
गावसकरांनी टीम इंडियाचं नेतृत्वपदाची जबाबदारही सांभाळली. त्यांनी एकूण 47 कसोटी आणि 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं. गावसकर हे टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारापैकी एक आहेत.
गावसकरांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 125 सामने खेळले. यामध्ये त्यांनी 51 च्या सरासरीने तसेच 66.04 स्ट्राईक रेटने 10 हजार 122 धावा केल्या. यामध्ये 4 द्विशतक, 34 शतक आणि 45 अर्धशतक लगावले आहेत.
संबंधित बातम्या :
(bcci celebrating 50th anniversary of little master sunil gavaskar Test debut for)