मुंबई : आत्ताच क्रिकेट (Cricket) विश्वातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. बीबीसीआयचे धडाकेबाज अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा (Bcci president sourav ganguly resigns) आहे. सौरव गांगुली गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होते. सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. भारताचा पूर्व धाकड कर्णधार अशीही सौरव गांगुली यांची ओळख आहे. त्यांंच्या अनेक धडाकेबाज निर्णयांसाठी त्यांना ओळखलं जातं. अनेक प्रकरणे त्यांनी आक्रमकरित्या हाताळली आहे. सौरव गांगुली यांच्या काळातच भारतीय क्रिकेटचा कर्णधार बदलल्याचेही सर्वांनी पाहिलं. कर्णधार पदावरून विराट कोहलीला हटवून कर्णधार पद हे अलिकडेच रोहित शर्माला देण्यात आलं आहे. त्यावेळीही गांगुली यांची भूमिका चर्चेत राहिली होती. आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची शक्यता आहे.
“I am planning to start something that I feel will probably help a lot of people,” tweets Sourav Ganguly. pic.twitter.com/SGxoPgmTNB
— ANI (@ANI) June 1, 2022
1992 ला माझा क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आणि 2022 हे त्या प्रवासाचं तिसावं वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटनं मला भरपूर
काही दिलंय. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दिलेला सपोर्ट. मी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त करु इच्छितो जो
ह्या प्रवासाचा भाग झाला, पाठिंबा दिला आणि मदत केली. त्या बळावरच आज मी तिथं पोहोचलोय जिथं आहे. आज मी
नवी काही योजना बनवतोय जी मला वाटतं की अनेक लोकांना फायदेशीर ठरेल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या
ह्या नव्या चॅप्टरमध्येही तुम्ही मला सपोर्ट कराल. -सौरव गांगुली
सौरव गांगुली यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार कोट्यातून राज्यसभा खासदार पदी निवड होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. कारण गेल्या अनेक दिवासांपासून सौरव गांगुली हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. आता त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नवी इनिंग…असा सूचक उल्लेख केल्याने आता या राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे सौरव गांगुली येत्या काळात राजकारणात उतरणार का? आणि राजकारणात उतरल्यास कोणत्या पक्षाकडून उतरणार? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “ह्या नव्या चॅप्टरमध्येही तुम्ही मला सपोर्ट कराल” असा आवाहनही त्यांच्या फॅन्सला केले आहे. त्यामुळे ते राजकीय कारकिर्दीला सुरूवात करु शकतात अशी जास्त शक्यता वर्तवली जातेय.