नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आता एका अडचणीत सापडले आहेत. हे प्रकरण थेट त्यांच्याशी संबंधित नसले तरी त्यांची सून मयंती लँगर यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण खरंतर त्यांच्या हितसंबंधाचेच आहे. त्यामुळे आता कंडक्ट अधिकारी विनीत सरन यांनी रॉजर बिन्नी यांना नोटीसच पाठवली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक अविभाज्य भाग असलेले रॉजर बिन्नी यांच्याविरोधात संजीव गुप्ता यांनी तक्रार केली होती.
त्यामुळे आता सरन यांनी बिन्नी यांच्या विरोधात हितसंबंधाच्या वादाच्या आरोपावरून 20 डिसेंबरपर्यंत त्यांना आता लेखी उत्तर द्यावे लागणार आहे.
रॉजर बिन्नी यांच्याविरोधात तक्रारदार संजीव गुप्ता यांनी आरोप जाहीर आरोप केला आहे की, बिन्नी यांच्यामध्ये हितसंबंधांचा संघर्ष आहे.
कारण त्यांची सून स्टार स्पोर्टसाठी काम करत आहे. आणि त्यांच्याकडेच भारतीय क्रिकेटच्या सामन्यासाठी त्यांच्याकडे माध्यमांचे अधिकार दिले आहेत.
विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले बिन्नी नुकताच ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष झाले आहेत. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी ते नुकताच आले होते. हेच बिन्नी भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.
रॉजर बिन्नी यांना जी नोटीस देण्यात आली आहे, त्या नोटीशीमध्ये म्हणण्यात आले आहे की, तुम्हाला कळवण्यात येते की, तुमच्या हितसंबंधांच्या संघर्षाबाबत बीसीसीआयच्या नियम 38 (1) (A) आणि नियम 38 (2) चे तुम्ही उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच त्यांना हे ही सांगण्यात आले आहे की, 20 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी तुमच्याकडून लेखी उत्तर देण्याबाबत तुम्हाला सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
67 वर्षीचे असलेले रॉजर मायकेल हम्फ्रे बिन्नी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. रॉजर बिन्नी हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू आहेत.
त्या विश्वचषक सामन्यात रॉजर बिन्नीने गोलंदाज म्हणून चमकदार कामगिरीही केली होती. याच बिन्नी यांनी त्या विश्वचषक सामन्यात सर्वाधिक 18 बळी घेऊन गोलंदाज म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळच्या संघातील या बिन्नी यांची चर्चा होत असली तरी त्यांच्याबरोबरच्या इतर खेळाडूंची मात्र चर्चा होत नाही.
रॉजर बिन्नी हा चमकदार कामगिरीचा खेळाडू असला तरी तो भारताकडून खेळणारा पहिला अँग्लो इंडियन क्रिकेटर होता. त्यानंतर त्यांच्या मुलानेही भारतीय संघात प्रतिनिधीत्व केले होते.
त्यांचा मुलगा म्हणजेच स्टुअर्ट बिन्नी. रॉजर बिन्नी यांनी 1979-87 दरम्यान भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर 1979 साली पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू कसोटीतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.