टीम इंडियामध्ये (Team India) मागच्या काही दिवसांपासून गोलंदाजांच्या कामगिरीवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण आशिया चषकापासून (Asia Cup 2022) टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब होत चालली आहे. दुखापतीतून सावरलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याची जागा कोण भरुन काढणार अशी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात पराभव झाला होता. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला होता.
कालच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या एका गोलंदाजाने टीम इंडियाच्या निवड समितीला विचारात नक्की पाडले असणार कालच्या सामन्यात त्याने कामगिरी तशी केली आहे.
मोहम्मद सिराजने काल चांगली कामगिरी केली. त्याने कालच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या, त्याचबरोबर दहा षटके टाकली, त्यामध्ये 38 धावा दिल्या आहेत. त्यामुळे कालपासून त्याच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. पुढच्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद सिराज संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.