“विराटकडे बघ आणि ठरव..” तिसऱ्या कसोटीपूर्वी कपिल देवनं रोहित शर्माला दिला असा सल्ला

| Updated on: Feb 23, 2023 | 5:14 PM

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी विजय मिळवावा लागणार आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव याने रोहित शर्माला खडे बोल सुनावले आहेत.

विराटकडे बघ आणि ठरव.. तिसऱ्या कसोटीपूर्वी कपिल देवनं रोहित शर्माला दिला असा सल्ला
कपिल देव यांनी रोहित शर्माला दिलं विराट कोहलीचं उदाहरण, म्हणाले...
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कसोटीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. दोन्ही कसोटी सामने भारतानं तिसऱ्या दिवशीच आपल्या खिशात घातले. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारताला आणखी विजय मिळवावा लागणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजयी घोडदौड सुरु असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव याने रोहित शर्माला फिटनेसबाबत खडे बोल सुनावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोहितच्या फिटनेसबाबत चर्चा रंगली आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. “फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. कर्णधारासाठी ते तर खुपच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फिट नसाल तर तुम्हाला त्याची लाज वाटली पाहीजे. रोहितनं त्याचं वजन कमी करण्यासाठी मेहनत केली पाहीजे.”, असं कपिल देव यांनी सांगितलं.

“रोहित शर्मा चांगला बॅटर आहे. पण तुम्ही जेव्हा त्याच्या फिटनेसबाबत विचारता तेव्हा तो जरा जास्तच जाडजूड असल्याचं दिसतं. टीव्हीतरी तसंच दिसतं. एखाद्याला टीव्हीवर पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं यात फरक आहे. पण मी जे काही पाहिलं त्यावरून एकच सांगतो की, रोहित चांगला प्लेयर आणि चांगला कर्णधार आहे. पण त्याने आपला फिटनेस राखणं गरजेचं आहे. विराटकडे बघ आणि ठरव. विराटनं कसं आपलं फिटनेस राखलं आहे.”, असं कपिल देव यांनी सांगितलं.

रोहित शर्मा कसोटी संघात जवळपास 11 महिन्यांनी परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पुनरागमन केलं आहे. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना तो कोरोना झाल्याने खेळू शकला नव्हता. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही बोटाच्या दुखापतीमुळे आराम देण्यात आला होता.

रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द

रोहित शर्मा आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळला असून 46.76 सरासरीने 3320 धावा केल्या आहेत. यात 9 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन गडी देखील बाद केले आहेत. वनडेत रोहित शर्मा आतापर्यंत 241 सामने खेळला आहे 48.91 च्या सरासरीने 9782 धावा केल्या आहेत. यात 30 शतकं आणइ 48 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत 8 गडी बाद केले आहेत. टी 20 मध्ये रोहित शर्मा आतापर्यंत 148 सामने खेळला आहे.4 शतकं आमि 29 अर्धशतकांच्या मदतीने 3853 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत एक गडी बाद केला आहे. आयपीएलमध्ये 407 सामने खेळला असून 6 शतकं आणि 72 अर्धशतकांच्या जोरावर 10,703 धावा केल्या आहेत. तसेच 29 गडी बाद केले आहेत.