Ben Stokes IPL 2021 Rajsthan Royals Team Player : अष्टपैलू बेन स्टोक्स राजस्थानसाठी हुकमी एक्का, 14 व्या मोसमातल्या कामगिरीकडे लक्ष

| Updated on: Mar 25, 2021 | 7:53 AM

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू निवडायचा झाला तर त्याच बेन स्टोक्सचा वरचा क्रमांक असेल. | ben Stokes

Ben Stokes IPL 2021 Rajsthan Royals Team Player : अष्टपैलू बेन स्टोक्स राजस्थानसाठी हुकमी एक्का, 14 व्या मोसमातल्या कामगिरीकडे लक्ष
Ben Stokes
Follow us on

मुंबई : बेन स्टोक्स (Ben Stokes), इंग्लंडचा (England) अष्टपैलू खेळाडू… आपल्या बॅटिंग आणि बोलिंग या दोन्ही अस्त्रांनी त्याने जगाला त्याची दखल घ्यायला लावलीय. एक ऑलराऊंडर प्लेअर म्हणून त्याची संघातली जागा प्रबळ मानली जाते. जर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू निवडायचा झाला तर त्याच बेन स्टोक्सचा वरचा क्रमांक असेल. डाव्या हाताने बॅटिंग आणि उजव्या हाताने बोलिंग हे त्याचं वैशिष्ट्य… अगदी सहाव्या- सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन कमी बॉलमध्ये अविस्मरणीय इनिंग खेळून संघाला जिंकवून देण्यात त्याचा हातखंडा आहे. बोलिंग बाबतही असंच काहीसं म्हणावं लागेल. संघाला पाहिजे त्या वेळी विकेट्स काढून देणारा भरवशाचा बोलर म्हणून इंग्लंडची टीम त्याच्याकडे पाहतो. बेन स्टोक्स (ben Stokes) आयपीएल संघामध्ये राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) या संघाकडून खेळतो. राजस्थानसाठीही स्टोक्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय. तो जसा अष्टपैलू खेळाडू म्हून ओळखला जातो त्याचा पूरेपूर वापर राजस्थानने करुन घेतलाय. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर टाकूया… (Ben Stokes IPL 2021 RR Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos England Cricket Players Latest News in Marathi)

बेन स्टोक्सचं टेस्ट, वनडे आणि टी ट्वेन्टीत पदार्पण कधी?

कसोटी पदार्पण- बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर 2013 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
वनडे पदार्पण – बेन स्टोक्सने आयर्लंडविरुद्ध ऑगस्ट 2011 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.
टी ट्वे्न्टी पदार्पण- बेन स्टोक्सने लेस्टइंडिजविरुद्ध सप्टेंबर 2011 मध्ये टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

बेन स्टोक्सचं बॅटिंग करिअर

Format  match     inning        Runs       High.Score    Strike Rate
Tests       71             130            4631         258                   58.12
ODIs      96              82             2683        102*                  93.61
T20Is    34               28             442             47*                 136.84
IPL        42                42             920           107*                 135.09

बेन स्टोक्सने आतापर्यंत 71 कसोटी मॅचेसमध्ये 58.12 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 631 रन्स केले आहेत. त्यातील 228 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 96 मॅचेसमध्ये 93.61 च्या सरासरीने 2 हजार 683 रन्स केले आहेत. त्यातील 102* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरलीय. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 34 मॅच खेळल्या आहेत. त्यात 136.84 च्या स्ट्राईट रेटने त्याने 442 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 47 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 42 सामन्यांत 135.09 च्या स्ट्राईक रेटने 920 रन्स केले आहेत. त्यात 107* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

बेन स्टोक्सचं बोलिंग करिअर

Format     Match    Inning      Runs      Wickets    BBI      BBM      Economy
Tests         71            116            5115          163         6/22      8/161       3.30
ODIs        96           81              2954          73          5/61       5/61          5.98
T20Is        34         28               717             19           3/26      3/26          8.77
IPL            42         42                  –                 28        3/15         –                 8.52

बेन स्टोक्सने आतापर्यंत 71 कसोटी मॅचेसमध्ये 163 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यातील एकाच कसोटीत 161 धावांत 8 गडी बाद हा त्याचा सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स ठरला आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 96 मॅचेसमध्ये त्याने 81 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यातील 61 धावा देत 5 गडी बाद हा त्याचा सर्वोत्तम फरफॉर्मन्स होता. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 34 मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने 28 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामध्ये 26 धावांत 3 गडी बाद हा त्याचा सगळ्यात चांगला फरफॉर्मन्स ठरला आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 42 सामन्यांत 28 विकेट्स मिळवल्या आहेत. 15 धावा देऊन प्रतिस्पर्धी संघाचे 3 गडी बाद ही हा त्याचा आयपीएलमधला सर्वोत्तम फरफॉर्मन्स ठरला आहे.

आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून…

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

(Ben Stokes IPL 2021 RR Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos England Cricket Players Latest News in Marathi)

हे ही वाचा :

David warner IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर सज्ज, हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक

Bhuvneshwar Kumar IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाका करण्यासाठी भुवनेश्वर सज्ज, हैदराबादसाठी हुकमाचा एक्का!