मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये चार टीम पोहोचल्या आहेत. त्यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझिलंड या टीमचा समावेश आहे. 9 नोव्हेंबरला पाकिस्त्नान आणि न्यूझिलंड यांच्यात मॅच होणार आहे. तर 10 नोव्हेंबरला टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात मॅच होणार आहे. सध्या टीम इंडिया (Team India) एडिलेड या मैदानात सराव करीत आहे. तिथं टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध (NZ) मॅच होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सराव करीत असताना जखमी झाला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित जखमी झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का मानला जात आहे. रोहितच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. विशेष म्हणजे ही जखम गंभीर असल्याचं कोणताही रिपोट अद्याप जाहीर झालेला नाही.
एडिलेडच्या मैदानात सराव करीत असताना ज्यावेळी रोहितच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तिथं अन्य खेळाडूही उपस्थित असल्याचं व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. तसेच हाताला जखम झाल्यानंतर रोहित सराव थांबवून एका बाजूला बसल्याचं दिसत आहे.
ज्यावेळी रोहित शर्माला जखम झाली. त्यावेळी रोहितने काहीवेळ विश्रांती घेतली. काहीवेळानंतर तिथं नेटमध्ये रोहितने काही चेंडू खेळल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी रोहित फीट आहे का ? याची सुद्धा चाचणी घेतली जाईल. समजा रोहित शर्माची जखम गंभीर असेल तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल.
विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडियाच्या पाच मॅच झाल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने चार मॅच जिंकल्या आहेत. फक्त एका मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे.