मुंबई : भारतीय क्रीडा रसिकांना अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवयाला मिळाले. मग तो 1983 चा वर्ल्डकप असो, 2003 वर्ल्डकपची सेमीफायनली मॅच असो, 2007 चा टी ट्वेन्टी वर्ल्डकप असो वा 2011 ला लंकेला पराभूत करुन तब्बल 28 वर्षांनी वर्ल्डकप उंचावण्याचा मान असो…. हे जसे आनंदाचे क्षण भारताच्या वाट्याला आले तसे काही निराशाजनक क्षणही भारतीय क्रीडा रसिकांना पाहायला लागले. त्यातील कधीही न विसरता येण्याजोगा क्षण म्हणजे 2007 च्या वर्ल्डकपमधील भारत बांगलादेश यांच्यातील मॅच… भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला आणि भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला त्यावेळचा 17 वर्षीय खेळाडू तमीम इक्बाल (tamim iqbal)… ज्याने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं… आज त्याच तमीमचा वाढदिवस…! (Birthday Special Bangladesh Captain Tamim iqbal record)
तमीमचा जन्म 20 मार्च 1989 रोजी बांगलादेशच्या चितगाव येथे झाला. क्रिकेटची त्याला लहाणापासूनच आवड होती. त्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले. क्रिकेटमध्ये पदार्पण करताच त्याने बांगलादेश क्रिकेटचं नशीब बदलणम्यास सुरुवात केली.
बांगलादेश क्रिकेट संघात काही नावाजलेले खेळाडू की ज्या खेळाडूंमध्ये जागतिक कीर्तीच्या संघाला धक्का देण्याची क्षमता आहे. अशा खेळाडूंमध्ये मशरफे मुर्तजा, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, मेहमुदुल्लाह अशा खेळाडूंचा समावेश… तमीमला त्याच काळात क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. तमीम बांगलादेश क्रिकेट संघाचा ओपनर बॅट्समन… सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघावर हल्लाबोल करण्यासाठी तो माहिर.. कव्हर ड्राईव्ह आणि पुलचे फटके खेळण्यासाठी त्याची ओळख…
तमीम इक्बालने फेब्रुवारी 2007 ला बांगलादेश क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या एक महिन्याच्या आतच वर्ल्डकप सुरु झाला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात बांगदेशी बोलर्सनी भारताचा 191 धावांवर खुर्दा उडवला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, एम एस धोनी यांसारखे दिग्गज खेळाडू असताना बांगलादेशने भारताचा 191 धावांवर पूर्ण संघ ऑलआऊट केला होता. आता वेळ बांगलादेशची होती. बांगलादेशकडून बॅटिंगसाठी मैदानात उतरला तमीम इक्बाल… जहीर खान, मुनाफ पटेल, अजित आगरकर, हरभजन सिंह यांच्या बोलिंग ठिकऱ्या ठिकऱ्या उडवून तमीमने आपलं अर्धशतक साजरं केलं. 53 चेंडूंमध्ये 51 धावा करुन बांगलादेशच्या विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या बॅटिंगमुळेच भारताला पराभवाचा धक्का बसला. तमीमच्या बॅटिंग परफॉरन्समुळे भारताची लाज जगासमोर आली.
तमीमने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये जबरदस्त रन्स केले. कसोटी क्रिकेटमधलं तमीमचं पदार्पण यादगार राहिलं. त्याने न्यूझीलंडविरुद्ध डेब्यू करताना पहिल्या डावांत 53 आणि दुसऱ्या डावात 84 धावा केल्या. तसंच कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलं. त्याच्या शतकाने पहिल्यांदाच बांगलादेश वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना जिंकला.
तमीम जरी बांगलादेशमध्ये जन्मला असला, त्याचं शिक्षण आणि क्रिकेट हे जरी बांगलादेशमध्ये व्यतित झालेलं असलं तरी त्याचं भारताशी, बिहारशी काही खास नातं आहे. तमीमचे पूर्वज हे मूळ बिहारमध्ये राहत होते. काही कारणास्तव त्यांनी चितगावला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते तिकडेच स्थायिक झाले.
हे ही वाचा :
‘नजर हटी दुर्घटना घटी…’, 22 वर्षीय युवा बोलर्सकडून MS धोनी क्लीन बोल्ड, पण तो बोलर कोण?
IPL 2021 : नवा आयपीएल हंगाम, नवा रंग; दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लॉन्च