नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गुरुवारी रात्री उशिरा खेळाडूंचा 2019-20 च्या कराराची घोषणा केली. नव्या करारानुसार ए प्लस श्रेणीमध्ये केवळ तीन खेळाडूंचाच समावेश आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना ए प्लस श्रेणीतून वगळण्यात आलं आहे.
शिखर धवनची कामगिरी गेल्या वर्षभरात निराशाजनक आहे. शिवाय भुवनेश्वर दुखापत किंवा अन्य कारणांमुळे फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे दोघांना ए प्लस श्रेणीतून बाहेर पडावं लागले.
दुसरीकडे युवा फलंदाज ऋषभ पंतला चांगल्या कामगिरीचं फळ मिळालं आहे, त्यामुळे त्याचा ए श्रेणीत समावेश करण्यात आला. ऋषभ पंतने टी 20, वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. महेंद्रसिंह धोनीनंतर एक चांगला कसोटी विकेटकीपर म्हणून ऋषभ उदयास येत आहे.
कोणत्या श्रेणीत कुणाला संधी?
A+ श्रेणी – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह
A श्रेणी – महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी
B श्रेणी – हार्दिक पांड्या, केएल राहुल, उमेश यादव, युजवेंद्र चहल
C श्रेणी – केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, रिद्धिमान साहा
कोणाला किती रक्कम मिळते?
A+ श्रेणी – वर्षाला 7 कोटी रुपये
A श्रेणी – वर्षाला 5 कोटी रुपये
B श्रेणी – वर्षाला 3 कोटी रुपये
C श्रेणी – वर्षाला 1 कोटी रुपये
महिला टीम
पुरुषांशिवाय महिला खेळाडूंची करार यादी बीसीसीआयने जाहीर केली. भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि पूनम यादव यांचा ए श्रेणीत समावेश आहे.
तर बी श्रेणीत एकता बिश्त, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, दिप्ती शर्मा, जेमिमाह यांना स्थान मिळालं.
याव्यतिरिक्त राधा यादव, हेमलता, अनुजा पाटील, वी. कृष्णामूर्ति, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया, पूजा यांचा समावेश सी गटात करण्यात आला आहे.
ए ग्रेडमधील महिलांना 50 लाख, बी ग्रेडमध्ये 30 लाख आणि सी ग्रेडमध्ये वार्षिक 10 लाख रुपये दिले जातात.
#TeamIndia Annual Player Contracts 2018-19: Grade A + @imVkohli @ImRo45 @Jaspritbumrah93 pic.twitter.com/8KCxhPgxb5
— BCCI (@BCCI) March 7, 2019
#TeamIndia Annual Player Contracts 2018-19: Grade C@JadhavKedar @DineshKarthik @RayuduAmbati @im_manishpandey @Hanumavihari @imK_Ahmed13 @Wriddhipops pic.twitter.com/R7NfNhlQuI
— BCCI (@BCCI) March 7, 2019
#TeamIndia Annual Player Contracts 2018-19: Grade B@klrahul11 @y_umesh @yuzi_chahal @hardikpandya7 pic.twitter.com/q9BpCILGDm
— BCCI (@BCCI) March 7, 2019
#TeamIndia Annual Player Contracts 2018-19: Grade A @ashwinravi99 @imjadeja @BhuviOfficial @cheteshwar1 @ajinkyarahane88 @msdhoni @SDhawan25 @MdShami11 @ImIshant @imkuldeep18 @RishabPant777 pic.twitter.com/ddaXGG7yeV
— BCCI (@BCCI) March 7, 2019