मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) चांगली कामगिरी खेळाडूंची अनेक दिग्गज खेळाडूंनी एक टीम तयार केली आहे. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चांगली खेळी करीत रेकॉर्ड केले. विशेष म्हणजे छोट्या टीमने मोठ्या टीमचा पराभव केला. काही खेळाडू पहिल्यांदा T20 विश्वचषक स्पर्धेत खेळले आणि रेकॉर्ड (Record) केला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) सर्वोत्कृष्ट 11 खेळाडूंची केली निवड केली आहे. त्यामध्ये भारतातील 4 खेळाडूंचा समावेश आहे.
ब्रेट लीने आपल्या युट्यूब चॅनेलला अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये ही माहिती सांगितली आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझिलंड आणि इंग्लंड या टीम उपांत्य फेरीत दाखल झाल्या होत्या. इंग्लंड टीमने विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण जगाने त्यांचं कौतुक केलं. इंग्लंडच्या टीममध्ये चांगले खेळाडू असल्यामुळे त्याचा विजय झाला.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे. काल बीसीसीआयने निवड समिती बरखास्त करुन टाकली. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडील T20 फॉरमॅटमधील कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.
भविष्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात येणार असून T20 फॉरमॅटमधील कर्णधारपद हार्दीक पांड्याला देण्यात येणार आहे.
या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, हार्दिक पांड्या, शादाब खान, आदिल रशीद, सॅम कुरान, शाहीन आफ्रिदी आणि अर्शदीप सिंग.